शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

दिल्लीकरांसाठी खुशखबर! केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, २०० युनिटपर्यंत वीज मोफत आणि ४०० पर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 17:40 IST

Delhi Govt Extends Free Electricity Bills Till Next Year : केजरीवाल सरकारने दिल्लीतील लोकांसाठी नवीन सौर धोरण आणले होते, ज्या अंतर्गत सरकार त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसविणाऱ्या लोकांना मोफत वीज देण्याची तयारी करत आहे. 

Delhi Govt Extends Free Electricity Bills And Subsidies Till Next Year : नवी दिल्ली:  राजधानी दिल्लीतअरविंद केजरीवाल सरकार आल्यापासून गेल्या ९ वर्षांपासून लोकांना वीज बिलात सवलत दिली जात आहे. ही सवलत भविष्यात कायम राहणार की नाही? याबाबत आज दिल्ली मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मंत्री सौरभ भारद्वाज, आतिशी, इम्रान हुसैन, कैलाश गेहलोत, गोपाल राय आणि राजकुमार आनंद उपस्थित होते.

या बैठकीत २०० युनिटपर्यंत मोफत वीज यापुढेही म्हणजेच पुढील वर्षांपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच धर्तीवर दिल्लीतील लोकांना पूर्वीप्रमाणे ४०० युनिटपर्यंतचे निम्मे बिल भरावे लागणार आहे. या मुद्द्यावर सरकारने आज तातडीची बैठक बोलावली होती. दरम्यान एक महिन्यापूर्वी, केजरीवाल सरकारने दिल्लीतील लोकांसाठी नवीन सौर धोरण आणले होते, ज्या अंतर्गत सरकार त्यांच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसविणाऱ्या लोकांना मोफत वीज देण्याची तयारी करत आहे. 

सौर धोरण २०२४ बद्दल माहिती देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, उद्योग चालवणाऱ्या लोकांनाही या अंतर्गत फायदा होईल. आपल्या व्यावसायिक युनिट्सवर सौर पॅनल बसवल्यास लोकांचे वीज बिल निम्म्याने कमी होऊ शकते. तसेच, जे आपल्या घराच्या छतावर सौर पॅनेल लावतात, त्यांना वीज कितीही युनिट वापरली तरी शून्य बिल भरावे लागेल, असेही  दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

दिल्ली सौर धोरणांतर्गत, केजरीवाल सरकारने पुढील तीन वर्षांत ५०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या सर्व सरकारी इमारतींमध्ये सौर पॅनेल बसवणे अनिवार्य करण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात ऊर्जा मंत्री आतिशी म्हणाल्या होत्या की, "नवी दिल्ली सौर धोरणाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे आणि  १० दिवसांच्या आत अधिसूचित केले जाण्याची शक्यता आहे."   

टॅग्स :delhiदिल्लीelectricityवीजArvind Kejriwalअरविंद केजरीवाल