शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवालांना धक्का! दिल्ली अध्यादेश स्थगितीला सुप्रीम कोर्टाचा नकार; केंद्राला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 17:23 IST

Arvind Kejriwal Vs Modi Govt: राज्यसभेत दिल्ली अध्यादेशाविरोधात मतदान करावे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांना केले आहे.

Arvind Kejriwal Vs Modi Govt: गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भातील अध्यादेशाविरोधात विरोधकांची मदत मागत आहे. या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत मतदान करावे, असे आवाहन अरविंद केजरीवाल करत आहेत. यातच आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी याबाबत केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. 

दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केंद्र सरकारच्या अध्यादेशाच्या घटनात्मकतेला आव्हान देणारी याचिका दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. दिल्ली सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सध्या तरी स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. अध्यादेशावर बंदी घालण्याच्या मागणीवर आता १७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

नायब राज्यपाल सुपर चीफ मिनिस्टर असल्यासारखे काम करत आहेत

दिल्ली तसेच दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये सल्लागार आणि फेलो म्हणून नियुक्त केलेल्या ४०० हून अधिक लोकांना कंत्राटी पद्धतीने काढून टाकण्याच्या आदेशाला स्थगिती देण्याच्या मागणीला स्थगिती देत ​​पुढील सोमवारी दोन्ही मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दिल्ली सरकारच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. या सुनावणीत अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी केली. दिल्लीतील नायब राज्यपाल सुपर चीफ मिनिस्टर असल्यासारखे काम करत आहेत, असा दावा करण्यात आला.

दरम्यान,  सर्वोच्च न्यायालयाने याचिकेत सुधारणा करत नायब राज्यपालांना पक्षकार बनवण्याची परवानगी दिली. त्यांनाही नोटीस बजावण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी करताना सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्या. पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार आणि नायब राज्यपालांना नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्यास सांगितले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवालCentral Governmentकेंद्र सरकार