शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

EDच्या दुसऱ्या चार्जशीटमधूनही सिसोदियांचे नाव गायब, CBIने केलं होतं आरोपी नंबर वन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 19:12 IST

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथीत घोटाळ्याची चौकशी करणार्‍या ईडीने न्यायालयात या प्रकरणात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे.

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील कथीत घोटाळ्याची चौकशी करणार्‍या ईडीने न्यायालयात या प्रकरणात दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीच्या आरोपपत्रात अटकेत असलेले पाच आरोपी विजय नायर, शरथ रेड्डी, बिनॉय बाबू, अभिषेक बोईनापल्ली, अमित अरोरा आणि ७ कंपन्यांसह १२ आरोपींच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. महत्वाची बाब अशी की ईडीच्या याही आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव नाही. तर सीबीआयने या प्रकरणात मनीष सिसोदिया यांना क्रमांक एकचे आरोपी केलं आहे.

दिल्लीतील कथीत अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी येथील न्यायालयात पाच आरोपी आणि सात कंपन्यांविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही या घोटाळ्यात आरोपी आहेत. ईडीने मात्र या प्रकरणातील आरोपी म्हणून सिसोदिया यांचे नाव घेतले नाही आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे न्यायालयाला सांगितले. हा अहवाल विशेष न्यायाधीश एम.के. नागपाल शनिवारी त्यावर विचार करणार आहेत. २०२१-२२ चे धोरण अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर रद्द करण्यात आले. आरोपपत्रात विजय नायर, शरत रेड्डी, बिनय बाबू, अभिषेक बोनपल्ली आणि अमित अरोरा यांचा समावेश आहे.

ईडीने आरोपपत्रात आतापर्यंत १२ जणांना अटक प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमांतर्गत या प्रकरणात ईडीने दाखल केलेले हे दुसरे पुरवणी आरोपपत्र आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिले आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांसह एकूण १२ जणांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे मनी लाँड्रिंग प्रकरण सीबीआयच्या एफआयआरवर आधारित असून त्यात सिसोदिया यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उपमुख्यमंत्री सिसोदिया आणि दिल्ली सरकारच्या काही नोकरशहांच्या आवारात छापे टाकले.

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदिया