शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
4
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
5
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
6
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
7
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
8
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
9
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
10
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
12
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
13
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
14
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
15
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
16
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
17
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
18
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
19
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
20
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

डॉक्टरांचा चमत्कार; अपंग रुग्णाला बसवले मृत महिलेचे हात, आता दोन्ही हाताने करू शकतो काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 17:17 IST

रेल्वे अपघातात हात गमावलेल्या व्यक्तीला मृत महिलेचे हात बसवण्यात आले.

नवी दिल्ली: देवाची कृपा असेल तर मुके बोलू लागतात अन् लंगडे चालू लागतात. आतापर्यंत तुम्ही हे फक्त ऐकत असेल, पण आता आता प्रत्यक्षात असे घडले आहे. दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे एचओडी डॉ. महेश मंगल यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने एक मोठा चमत्कार केला. 

ब्रेन डेड महिलेचे हात बसवलेदिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी तीन वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या व्यक्तीचे दोन्ही हात पुन्हा जिवंत केले. या 45 वर्षीय व्यक्तीला 65 वर्षीय ब्रेन डेड महिलेचे हात बसवण्यात आले. तब्बल 12 तासांच्या अथक परिश्रमानंतर मृत महिलेचा हात कापून तरुणाला जोडण्यात 7 डॉक्टरांच्या पथकाला यश आले. ती व्यक्ती आता स्वतःच्या हाताने अन्न खाऊ शकते आणि सामान्य माणसाप्रमाणे इतर कामेही करू शकते.

अवयव दानाने अनेकांना जीवदानदिल्लीतील सेवानिवृत्त उपप्राचार्य कालका जी यांना ब्रेन हॅमरेज झाला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी यकृत, किडनी, हात आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांची एक किडनी गुरुग्रामच्या फोर्टिस रुग्णालयातील एका रुग्णाला बसवण्यात आली. याशिवाय महिलेचे दोन्ही हात, यकृत आणि कॉर्नियाचे सर गंगाराम रुग्णालयात वेगवेगळ्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले आहे. दोन्ही हातांचे प्रत्यारोपण हे उत्तर भारतातील अशा प्रकारचे पहिले प्रत्यारोपण आहे. यापूर्वी मुंबईत या प्रकारचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

रुग्णाकडून एकही रुपया घेतला नाहीया शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम तैनात करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व डॉ.महेश मंगल करत होते. डॉ. महेश मंगल हे देशातील प्रसिद्ध प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन असून, सध्या ते गंगाराम हॉस्पिटलच्या प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जरी विभागाचे अध्यक्ष कम एचओडी आहेत. विशेष म्हणजे, भारतात हात प्रत्यारोपणासाठी साधारणपणे 25 ते 30 लाख रुपये खर्च येतो. पण, प्रत्यारोपणासाठी रुग्णालयाने त्या रुग्णाकडून कोणतेही शुल्क घेतलेले नाही.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलJara hatkeजरा हटकेdelhiदिल्ली