शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Delhi: जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावी लागली एक किडनी आणि फुफ्फुस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 21:51 IST

Corona virus: गाझियाबादचे रहिवासी असलेले रणजीत कुमार यांना गेल्या महिन्यात तीव्र ताप आणि थुंकीत रक्त येण्याच्या तक्रारीनंतर दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ब्लॅक फंगस आजाराला सामोरं जावं लागलं. या ब्लॅक फंगसमुळे काहींना आपला एक डोळा, काहींना दोन्ही डोळे तर गमवावे लागले. याशिवाय, या फंगसमुळे काही रुग्णांचा मृत्यूही झाला. पण, आता दिल्लीतील एका रुग्णालयातून एका धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ब्लॅक फंगसने ग्रस्त रुग्णाची एक किडनी आणि फुफ्फुसाचा काही भाग काढावा लागला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाझियाबादचे रहिवासी 45 वर्षीय रणजीत कुमार यांना मागच्या महिन्यात म्यूकरमायकोसिस(ब्लॅक फंगस) आजाराची लागण झाली होती. त्यांना तीव्र ताप आणि थुंकीत रक्त आल्याच्या तक्रारीनंतर दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. रुग्णालयात त्यांची सर्व तपासणी करण्यात आल्यावर त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

6 तास सर्जरीसामान्यतः ब्लॅक फंगस डोळ्यांवर हल्ला करतो, पण रणजीत यांच्या केसमध्ये फंगस त्यांच्या डाव्या फुफ्फुस आणि उजव्या मूत्रपिंडात पसरलं होतं. तात्काळ ऑपरेशन न केल्यास त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे डॉक्टरांनी आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि 6 तासांच्या कठीण ऑपरेशननंतर त्यांची उजवी किडनी आणि फुफ्फुसाचा काही भाग काढून टाकला.

जगातील पहिलेच प्रकरणरुग्णालयातील यूरोलॉजी विभागाचे सल्लागार डॉ.मनू गुप्ता यांनी सांगितल्यानुसार, रणजीत यांचे हे ऑपरेशन अतिशय कठीण स्वरुपाचे होते. फंगस रणजीत यांच्या फुफ्फुस आणि मूत्रपिंडाच्या काही भागात पसरल्याने त्यांच्या जीवाला धोका होता. त्यांचा जीव वाचवण्यासाठी तात्काळ ऑपरेशन करणं गरजेचं होतं. किडनी आणि फुफ्फुसात फंगस झालेले रणजीत जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. दरम्यान, यशस्वी ऑपरेशन झाल्यानंतर महिनाभर रुग्णालयात उपचार घेऊन रणजित यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे   . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMucormycosisम्युकोरमायकोसिस