Delhi Exit Poll 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ८ एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पी-मार्क, चाणक्य स्ट्रॅटेजीज आणि पीपल्स इनसाइटसह बहुतेक सर्व्हेंमध्ये अथवा सर्वेक्षणांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत देण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत केवळ दोन सर्वेक्षणांमध्येच 'आप'च्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्वेक्षणांमध्ये वर्तवण्यात आलाय आपच्या विजयाचा अंदाज -माइंड ब्रिंक (Mind Brink) आणि विप्रेसिड यांनी केलेल्या सर्वेक्षणात आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माइंड ब्रिंकच्या एक्झिट पोलनुसार, अरविंद केजरीवाल ४४ ते ४९ जागा जिंकून सत्तेत परततील, तर भाजप पूर्वीपेक्षा अधिक जागा जिंकून विरोधी पक्षातच बसेल. भाजपला २५ ते २९ जागा मिळतील, तर काँग्रेसला शून्य अथवा फक्त एका जागेवर समाधान मानावे लागेल, असा अंदाज आहे.
याशिवाय, याशिवाय, वीप्रेसिडच्या एक्झिट पोलनेही 'आप'च्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार, 'आप'ला ४६-५२ च्या दरम्यान जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला १८-२३ जागा मिळणे अपेक्षित आहे. यानुसार काँग्रेसला केवळ एकच जागा मिळेल.
हे पोल कितपत खरे ठरतात हे बघणे औत्सुक्याचे असेल -आतापर्यंत जाहीर झालेल्या पोलच्या तुलनेत हे एक्झिट पोल आश्चर्यचकित करणारे आहेत. अशा स्थितीत, ८ फेब्रुवारी रोजी अर्थात निकालांच्या दिवशी, सर्वांच्या नजरा या सर्वेक्षणांवर असतील, हे पोल कितपत खरे ठरतात हे बघणे औत्सुक्याचे असेल.
हे सर्वेक्षण यासाठीही आश्चर्यचकित करणारे आहे, कारण आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी आकडे जाहीर केले आहेत, साधारणपणे त्यांनी सर्वांनीच भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.