शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फोन तोडला, पुरावे नष्ट केले...सिसोदियांच्या रिमांडवर ED नं कोर्टाला काय-काय सांगितलं पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 20:33 IST

दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणातील आरोपी असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत कोर्टानं पाच दिवसांची वाढ केली आहे.

दिल्लीतील कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणातील आरोपी असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत कोर्टानं पाच दिवसांची वाढ केली आहे. सिसोदियांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणारं विनंती पत्र ईडीनं कोर्टात दिलं होतं. यावर निर्णय देताना कोर्टानं ईडीची विनंती मान्य करत कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे. 

मनीष सिसोदियांचा बंगला आतिशीला दिला, 'त्यांची आई, बायको आणि मुलं कुठे जाणार?' भाजपचा सवाल

सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना ईडीनं याप्रकरणाशी निगडीत काही तथ्य कोर्टासमोर मांडले. दिल्ली सरकारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी कथित अबकारी घोटाळ्याबाबत मोठ्या प्रमाणावर पुरावे नष्ट करण्यासोबतच पुरावे लपवले असल्याचा दावा ईडीनं केला आहे. फोन नष्ट करणे यामागे गुन्हा लपवण्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येतो. मोठ्या प्रमाणावर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी, गुन्ह्यातून मिळालेली रक्कम, मनी ट्रेल तसेच गुन्ह्याच्या कमाईशी संबंधित प्रक्रियेत सहभागाचे पुरावे जाणूनबुजून नष्ट केले गेले. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यात आले आहेत, असं ईडीनं कोर्टात म्हटलं आहे. 

ज्या दिवशी CBI मध्ये तक्रार त्याच दिवशी सिसोदियांनी फोन बदललाएलजीने सीबीआयकडे तक्रार पाठवली त्याच दिवशी मनीष सिसोदिया यांनी फोन नष्ट केला, जो ते बराच काळ वापरत होता. ईडीने माहिती दिली की, चौकशी दरम्यान मनीष सिसोदिया यांनी खुलासा केला आहे की ते बराच काळ (किमान गेल्या 8 महिन्यांपासून) ते एकाच मोबाईल फोनचा वापर करत होते. जो २२ जुलै २०२२ रोजी बदलला होता. ईडीने सांगितले की हे सर्व ज्या तारखेला दारू घोटाळ्याची तक्रार एलजीने सीबीआयकडे पाठवली त्याच तारखेला करण्यात आले आहे.

ईडीने म्हटले आहे की, "दुसऱ्या व्यक्तीचे सिम कार्ड आणि हँडसेट वापरल्याने पुरावे नष्ट करण्याची सुनियोजित योजना उघड होते. दुसर्‍या व्यक्तीच्या नावाने नोंदणीकृत सिम कार्ड आणि हँडसेट वापरण्याचा उद्देश सिमशी संबंधित व्हॉट्सअॅप/डेटा आणि फोनमध्ये साठवलेला डेटा त्याच्या मालकीचा आहे हे नाकारणे हा आहे. हे पुरावे नष्ट करण्याची आणि मोबाईल नष्ट करण्याची सुनियोजित योजना दर्शवते”

ओबेरॉय हॉटेलच्या बिझनेस सेंटरमध्ये डिल(ईडी) ने सांगितले की, साउथ ग्रूपचे सदस्य/प्रतिनिधी १४ मार्च ते १७ मार्च २०२१ या कालावधीत ओबेरॉय हॉटेल, नवी दिल्ली येथे थांबले होते, असेही तपासात समोर आले आहे. ओबेरॉय हॉटेलच्या बिझनेस सेंटरचा वापर साऊथ ग्रुपच्या प्रतिनिधींनी केला होता. या कालावधीत मसुदा GoM अहवालात (5% ते 12%) बदल झाले.

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदिया