शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातव्यांदा समन्स; आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 11:36 IST

Delhi Excise policy case : यापूर्वी, अरविंद केजरीवाल सोमवारी (१९ फेब्रुवारी) ईडीसमोर हजर होणार होते, परंतु ते हजर झाले नाहीत. 

Delhi Excise policy case  (Marathi News) नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून सातव्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी (२२ फेब्रुवारी) समन्स पाठवले असून येत्या सोमवारी (२६ फेब्रुवारी) चौकशीसाठी बोलावले. यापूर्वी, अरविंद केजरीवाल सोमवारी (१९ फेब्रुवारी) ईडीसमोर हजर होणार होते, परंतु ते हजर झाले नाहीत. 

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. याप्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. आतापर्यंत ईडीने अरविंद केजरीवाल यांनी सात वेळा समन्स पाठवले आहे. दरम्यान, मागील समन्सवेळी आपने ईडीचे हे समन्स बेकायदेशीर असल्याचे म्हटले होते. आपने एक निवेदन जारी करून म्हटले होते की, 'ईडीच्या समन्सच्या वैधतेचे प्रकरण आता न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी ईडी स्वतः न्यायालयात गेली आहे. अशा परिस्थितीत ईडीने वारंवार समन्स पाठवण्याऐवजी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी.' 

दरम्यान, ईडीने उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात समन्सचे पालन न केल्याबद्दल अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली आहे.  ईडीच्या तक्रारीत, अरविंद केजरीवाल जाणूनबुजून समन्सचे पालन करू इच्छित नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, जर त्यांच्यासारख्या उच्चपदस्थ सार्वजनिक अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन केले तर ते सामान्य माणसासाठी वाईट उदाहरण ठरेल, असेही ईडीने म्हटले आहे.

ईडीने अरविंद केजरीवाल यांना कधी-कधी पाठवले समन्स?ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते. या समन्सवर ते हजर झाले नाहीत. त्यानंतर ईडीने २१ डिसेंबर २०२३ रोजी दुसरे समन्स पाठवले, त्यालाही अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. ३ जानेवारी २०२४ रोजी ईडीने अरविंद केजरीवाल यांना तिसरे समन्स पाठवले होते, परंतु ते हजर झाले नाहीत. १७ जानेवारी २०२४ रोजी ईडीने चौथे समन्स पाठवले, पण अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा गैरहजर राहिले. यानंतर २ फेब्रुवारी २०२४ रोजी ईडीने पाचवे समन्स पाठवले, पण अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. १४ फेब्रुवारीला सहावे समन्स पाठवल्यानंतर ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला बोलावले, पण अरविंद केजरीवाल हजर झाले नाहीत. आता २२ फेब्रुवारीला सातवे समन्स पाठवले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय