शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

अरविंद केजरीवाल बनले आरोपी क्रमांक 37! ED नं चार्जशीटमध्ये लावले अतिशय गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 21:50 IST

आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना १२ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आले आहे.

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आता ईडीने अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गंभीर आरोपपत्र दाखल केले आहे. यात, केजरीवाल संबंधित प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचे इडीने म्हटले आहे. याशिवाय, लाचेचे पैशांची माहिती केजरीवाल यांना होती, तसेच तेही यात सहभागी होते, असेही आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना १२ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात प्रोडक्शन वॉरंट जारी करण्यात आले आहे.

ईडीने केजरीवाल यांना आरोपी क्रमांक 37 केले -अबकारी धोरण लागू करण्यासाठी १०० कोटी रुपयांची लाच घेण्यात आली. यांपैकी ४५ कोटी रुपये आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरले, असा आरोप करत ईडीने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. याच बरोबर, ईडीने अरविंद केजरीवाल यांचा मुख्य सूत्रधार म्हणून समावेश करून त्यांना आरोपी क्रमांक ३७ केले आहे. तर आम आदमी पक्षाला आरोपी क्रमांक 38 करण्यात आले आहे.

विनोद चौहान केजरीवाल यांचे निकटवर्तीय -ईडीने याच वर्षाच्या मे महिन्यात अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय विनोद चौहान याना अटक केली होती. विनोद चौहान गोवा निवडणुकीसाठी हवालाकडून 45 कोटी रुपये पाठविण्यासाठी थेट जबाबदार आहे आणि पैसे गोव्याला पोहोचल्यानंतर, ते चनप्रीत सिंह यांनी मॅनेज केले, असा दावाही ईडीने केला आहे. एवढेच नाही, तर विनोद चौहान यांचे हवाला व्यापाऱ्यांसोबत अत्यंत चांगले नाते आहे, असा दावाही चार्जशीट मध्ये करण्यात आला आहे.

45 कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराचे पुरावे देऊनही केजरीवाल यांनी आपल्याला कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचे म्हटले आहे, असा दावाही ईडीने आपल्या आरोपपत्रात केला आहे. महत्वाचे म्हणजे, आरोपपत्रात अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याचाही समावेश आहे. यात निधीच्या निर्णयात आपली कोणतीही भूमिका नसून लाच घेतलेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय