शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

Delhi Election Results: दिल्ली म्हणते 'लगे रहो केजरीवाल'; पण अडकले मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे साथीदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 12:47 IST

Delhi Assembly Election Results Updates: मुख्यमंत्र्यांचे दोन महत्त्वाचे साथीदार पिछाडीवर

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. आपनं ५६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा १४ मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत. केजरीवालांनी जबरदस्त आघाडी घेत विजय जवळपास निश्चित केला आहे. केजरीवालांना आतापर्यंत १७ हजार ७५६ मतं मिळाली. केजरीवालांसमोर भाजपाच्या सुनील यादव यांचं आव्हान आहे. यादव यांना आतापर्यंत ७ हजार ९४१ मतं मिळाली आहेत. आतापर्यंतची मजमोजणी लक्षात घेतल्यास केजरीवालांना ६४ टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत.केजरीवालांचे निकटवर्तीय आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया मात्र पतपारगंज मतदारसंघात पिछाडीवर आहेत. सिसोदिया यांना आतापर्यंत ३४ हजार २२२ मतं मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी रविंदर सिंग नेगी यांना ३५ हजार ८१ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात सिसोदिया मागे पडल्यानं आपला धक्का बसला आहे. सिसोदिया यांच्यासोबत आपच्या अतिषी मार्लेनादेखील पिछाडीवर आहेत. मार्लेना यांच्यासमोर भाजपाच्या धरमबीर सिंग यांचं आव्हान आहे. त्यांना आतापर्यंत २३ हजार ५९ मतं मिळाली आहेत. तर मार्लेना यांना २२ हजार ८८७ मतं मिळाली आहेत.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपा