शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results : आपचा 'विजय रथ' तयार, केजरीवाल होणार विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 09:27 IST

Delhi Election Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टी सध्या 53 जागांवर आघाडीवर आहे.

ठळक मुद्देआम आदमी पार्टी सध्या 53 जागांवर आघाडीवर आहे. पुन्हा एकदा दिल्लीत बहुमताच्या जोरावर आम आदमी पार्टीचेच सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. भाजपा 16 जागांवर पुढे असून, काँग्रेसला 2-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पार्टी सध्या 53 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत बहुमताच्या जोरावर आम आदमी पार्टीचेच सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. भाजपा 16 जागांवर पुढे असून, काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार स्थापन करणार असल्याचं जवळपास ठरलेलं असून, केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होताना दिसत आहेत.विजयानंतरच्या सेलिब्रेशनचीही आम आदमी पार्टीनं तयारी पूर्ण केलेली आहे. रोड शो करण्यासाठी आम आदमी पार्टीनं एका जीपला सजवलं आहे. दिल्लीतल्या सुरुवातीच्या कलांनुसार आम आदमी पार्टीचे अमानतुल्लाह खान, मनीष सिसोदिया, अरविंद केजरीवाल हे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा पुढे आहेत. तर काँग्रेसचे अरविंदर सिंह लवली हे पिछाडीवर आहेत. आम आदमी कार्यकर्त्यांनी पूर्ण कार्यालय फुग्यांनी सजवलं आहे. निकालानंतर अरविंद केजरीवालांबरोबरआपचे मोठे नेतेसुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं 70पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाच्या पारड्यात तीन जागा पडल्या होत्या. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. दुसरीकडे भाजपाचे दिल्लीतले प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचाच विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मी आता उदास नाही. भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल, अशी मला आशा आहे. आम्ही आज दिल्लीत सत्तेत येणार आहोत. आम्ही जर 55 जागा जिंकलो तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तत्पूर्वीही मनोज तिवारी यांनी ट्विट करत 48 जागा जिंकण्याचा दावा केला होता.

Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावाDelhi Election Result : निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयलमतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप