शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त; विजयानंतर अमित शाह यांचा केजरीवालांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:04 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

BJP Amit Shah: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आलेल्या कलांनुसार भाजपला निर्विवाद बहुमत मिळणार, हे स्पष्ट झालं आहे. मतमोजणीच्या अवघ्या काही फेऱ्या बाकी असताना भाजपने ४५ हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याने तब्बल २७ वर्षांनंतर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजपची सत्ता येणार, हे निश्चित झालं आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाचा दारुण पराभव केल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, "दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेनं खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शीशमहल' उद्ध्वस्त करत दिल्लीला संकटमुक्त केलं आहे. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाहीत, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेनं धडा शिकवला आहे," असा टोला शाह यांनी लगावला आहे. 

"दिल्लीमध्ये आता विकास आणि विश्वासाचं एक नवं युग सुरू होणार आहे. दिल्लीत असत्याच्या सरकारचा शेवट झाला आहे. हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. हा दिल्लीवासीयांनी मोदींची गॅरंटी आणि मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर दाखवलेल्या विश्वासाचा विजय आहे. या प्रचंड विजयाबद्दल दिल्लीकरांचे मन:पूर्वक आभार.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सर्व आश्वासनांची पूर्तता करून दिल्लीला जगातील सर्वोत्तम राजधानी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. लोकांनी मतदानातून दूषित झालेली यमुना नदी, पिण्याचे अस्वच्छ पाणी, खराब रस्ते आणि गल्लोगली निर्माण झालेल्या दारुच्या अड्ड्यांविरोधात आपला रोष व्यक्त केला आहे," अशी टीकाही अमित शाह यांनी आम आदमी पक्षावर केली आहे.

दरम्यान, "दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या या दणदणीत विजयाबद्दल मी दिल्ली भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचं, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं अभिनंदन करतो. महिलांचा सन्मान, कॉलोनीवासियांचा स्वाभिमान आणि स्वयंरोजगाराच्या संधींसह मोदींच्या नेतृत्वात दिल्ली आता एक आदर्श राजधानी होईल," असंही अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवालDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूक