शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Result: निकालापूर्वीच 'या' काँग्रेस उमेदवारानं स्वीकारला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:11 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे.

ठळक मुद्दे. मतमोजणीच्या कलांनुसार दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या स्थानी भाजपा आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नसून भोपळाही फोडता आलेला नाही.विकासपुरी विधानसभा जागेवरून काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा पिछाडीवर असून, त्यांनी जवळपास पराभव स्वीकारलेला आहे

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झालेली आहे. मतमोजणीच्या कलांनुसार दिल्लीत सत्ताधारी आम आदमी पार्टी सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या स्थानी भाजपा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा झालेली नसून भोपळाही फोडता आलेला नाही. काँग्रेसच सर्वच उमेदवार पिछाडीवर आहेत.मतमोजणीच्या हाती आलेल्या कलानुसार विकासपुरी विधानसभा जागेवरून काँग्रेस उमेदवार मुकेश शर्मा पिछाडीवर असून, त्यांनी जवळपास पराभव स्वीकारलेला आहे. त्यांनी ट्विट करत मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांप्रति आभार व्यक्त केला आहे. मुकेश शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. मी माझा पराभव स्वीकारतो, विकासपुरी विधानसभा क्षेत्रातील सर्व मतदार आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो. मला आशा आहे की, क्षेत्राचा चारही बाजूंनी विकास होणार आहे. मी भविष्यात दिल्ली, विकासपुरी आणि उत्तम नगर विधानसभा क्षेत्राच्या चतुर्भुज विकासासाठी लढाई लढत राहीन. भाजपाचे दिल्लीतले प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आमचाच विजय होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला आहे. मी आता उदास नाही. भाजपासाठी हा चांगला दिवस ठरेल, अशी मला आशा आहे. आम्ही आज दिल्लीत सत्तेत येणार आहोत. आम्ही जर 55 जागा जिंकलो तर आश्चर्य वाटण्याची गरज नाही. तत्पूर्वीही मनोज तिवारी यांनी ट्विट करत 48 जागा जिंकण्याचा दावा केला होता.

हनुमान मंदिरात पोहोचले भाजपा नेते विजय गोयलमतमोजणीपूर्वीच भाजपा नेते आणि राज्यसभा सदस्य विजय गोयल कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दिल्लीत भाजपाचं सरकार येईल, असा दावाच विजय गोयल यांनी केला आहे. भाजपा आपल्या ताकदीवर बहुमत मिळवेल, अशी आशाही गोयल यांनी व्यक्त केली आहे.

दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसdelhi electionदिल्ली निवडणूक