शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

वडिलांचं पंक्चर दुकान अन् पोरगा दिल्लीत आमदार; केजरीवालांच्या 'आप'चा हा मराठी शिलेदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 16:06 IST

२०१५ च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं ६२ जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत ५ जागा कमी झालेल्या आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीच्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची संधी दिल्लीकरांनी दिली आहे. एकूण ७० जागांपैकी आपचे ६२ आमदार निवडून आले आहेत. यामध्ये एक मराठमोळा आमदारही दिल्ली विधानसभेत निवडून आला आहे. जंगपुरा येथील विधानसभा मतदारसंघात प्रविण देशमुख हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. 

मध्य प्रदेशतील भोपाळ येथील रहिवाशी पी.एन देशमुख गेल्या अनेक वर्षापासून पंक्चरचं दुकान चालवतात. त्यांचा मुलगा प्रविण देशमुख दुसऱ्यांदा आपकडून आमदार म्हणून निवडून आलेला आहे. मूळचं मराठी असलेलं हे देशमुख कुटुंब भोपाळमध्ये वास्तव्यास आहे. २१ डिसेंबर १९८४ मध्ये प्रविण देशमुख यांचा जन्म झाला. शिक्षणात अव्वल असलेल्या प्रविणने सायन्स पदवीधारक असून एमबीएची डीग्रीही घेतली आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला प्रभावित होऊन प्रविण देशमुखने नोकरी सोडून सामाजिक कार्यात सहभागी झाला. आंदोलन संपल्यानंतर प्रविणने अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाचं काम करण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा दिल्ली उपाध्यक्षपदाची जबाबदारी प्रविणने सांभाळली, २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या निवडणुकीत आपने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत प्रविणचा विजय झाला. 

प्रविण देशमुख आमदार झाल्यानंतरही त्याचे वडील पी.एन देशमुख भोपाळमध्ये पंक्चरचं दुकान चालवत होते. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा प्रविण देशमुख आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र वडील पीएन देशमुख कोणताही गर्व न बाळगता पंक्चर काढण्याचं काम करतात. दिल्लीच्या रणांगणात आप पक्षाविरोधात भाजपाने सर्व ताकद पणाला लावली होती. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे १०० हून अधिक खासदार दिल्लीत प्रचारासाठी आले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 

२०१५ च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं ६२ जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत ५ जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत ८ जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या ६७ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. दरम्यान, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत झालेल्या पराभवामुळे भाजपाची चिंता वाढलेली आहे. भाजपाला दिल्लीतली सत्ता हवी होती, त्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती पण दिल्लीत लाजिरवाणा पराभव झाला. 

महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणार अरविंद केजरीवाल? 'आप'चा राष्ट्रीय राजकारणात शिरकाव

पश्चिम बंगालमध्येही मिळणार मोफत वीज; महाराष्ट्रात अजित पवार नकारात्मक

'बजरंगबलीच्या कृपेनं जिंकलात, आता शाळा-मदरशांमध्ये हनुमान चालिसा शिकवा'

...म्हणून अरविंद केजरीवाल यांना कुटुंबीय म्हणायचे 'कृष्ण'

'आप'मधून बाहेर पडले... भाजपा, काँग्रेसकडून लढले... निवडणुकीत गडगडले!

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालMLAआमदारmarathiमराठी