नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान भाजपाच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागलेला पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पोस्टर ऐन मतमोजणीच्या वेळीच समोर आल्यानं अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजपानं मतमोजणीपूर्वीच पराभव स्वीकार केलेला आहे का?, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात लागलेला पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो आहेत. तसेच त्यावर लिहिलं आहे की, विजयानं आम्ही अहंकारी होत नाही, तर पराभवानं आम्ही निराश होत नाही. हा पोस्टर भाजपाच्या दिल्लीतल्या पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. दुसरीकडे मजमोजणीपूर्वीच भाजपा नेत्यानं विजयाचा दावा केला आहे.
Delhi Election Result 2020 : निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 08:57 IST
Delhi Election Result 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
Delhi Election Result 2020 : निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर
ठळक मुद्देभाजपाच्या दिल्ली प्रदेश कार्यालयात लागलेला पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहे. हा पोस्टर ऐन मतमोजणीच्या वेळीच समोर आल्यानं अनेक अंदाज बांधले जात आहेत. भाजपानं मतमोजणीपूर्वीच पराभव स्वीकार केलेला आहे का?, अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.