शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

आप की काँग्रेस, मुस्लीम मतदार कुणासोबत? एक्झिट पोलमधून समोर आला धक्कादायक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 07:55 IST

Delhi Exit Poll 2025 : बहुतांश एक्झिटपोलमध्ये दिल्लीत भाजपचे सरकार येणार, असे भाकित करण्यात आले आहे. तर काहींमध्ये आपला पुन्हा संधी मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची मोठी भूमिका असते, ती कुणाच्या पारड्यात जातात, यावरही बरेच गणित अवलंबून असते.

Delhi Assembly Election 2025 : दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर एक्झिटपोलही समोर आले आहेत. बहुतांश एक्झिटपोलमध्ये दिल्लीत भाजपचे सरकार येणार, असे भाकित करण्यात आले आहे. तर काहींमध्ये आपला पुन्हा संधी मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतांची मोठी भूमिका असते, ती कुणाच्या पारड्यात जातात, यावरही बरेच गणित अवलंबून असते. 2025 च्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात करण्यात आलेल्या एक्झिट पोलमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील मुस्लीम समाजाने पुन्हा एकदा आम आदमी पक्षावर विश्वास दर्शवला आहे. तर भाजपच्या पारड्यात काँग्रेसपेक्षाही अधिक मुस्लीम मते जाताना दिसत आहेत.

असा आहे मॅट्रिझचा अंदाज -मॅट्रिझच्या सर्वेक्षणानुसार, या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ६७ टक्के मुस्लीम मते मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या पारड्यात ११ टक्के आणि काँग्रेसच्या पारड्यात ९ टक्के मुस्लीम मते जाण्याची शक्यता आहे. याशिवाय १३ टक्के मुस्लीम मते इतरांच्या खात्यात जाऊ शकतात. यापूर्वी २०२० च्या विधानसभा निवडणुकीत 'आप'ला ८७ टक्के मुस्लीम मते मिळाली होत. अर्थात, आता मुस्लिम मते 'आप'कडून इतर पक्षांकडे जाताना दिसत आहेत. 

मुस्लीम बहुल भागातील मतदान -सायंकाळी ५ वाजेपर्यंत दिल्लीत ५७.७० टक्के एवढे मतदान झाले. येथील मुस्लीम भागांचा विचार करता, चांदणी चौक येथे ५२.७६ टक्के, मतियामहल येथे ६१.४० टक्के, बल्लीमारन येथे ५९.५६ टक्के, ओखला येथे ५२.७७ टक्के, सीमापुरी येथे ६२.४७ टक्के, सीलमपूर येथे ६६.१४ टक्के, बाबरपूर येथे ५४.५१ टक्के, मुस्तफाबाद येथे ६६.६८ टक्के, करावलनगर येथे ६२.७४ टक्के तर जंगपुरा येथे ५५.२ टक्के मतदान झाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Muslimमुस्लीमVotingमतदानAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा