शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

दिल्ली निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, अरविंद केजरीवालांना आव्हान देणार प्रवेश वर्मा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:46 IST

BJP First Candidate List : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे.

BJP First Candidate List : नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत भाजपने २९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने प्रवेश साहिब सिंह वर्मा यांना तिकीट दिले आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात रमेश बिधुरी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे आपमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या कैलाश गेहलोत यांना बिजवासन मतदारसंघातून पक्षाने तिकीट दिले आहे.

भाजपने आदर्श नगर मतदारसंघातून राजकुमार भाटिया, बदलीमधून दीपक चौधरी, रिठालामधून कुलवंत राणा, नांगलोई जाटमधून मनोज शौकीन, मंगोलपुरीमधून राजकुमार चौहान, रोहिणीमधून विजेंद्र गुप्ता, शालीमार बागमधून रेखा गुप्ता, मॉडल टाउनमधून अशोक गोयल, करोल बागमधून दुष्यंत कुमार गौतम, पटेल नगरमधून राजकुमार आनंद, राजौरी गार्डन येथून सरदार मनजिंदर सिंग सिरसा, जनकपुरीमधून आशिष सूद यांना तिकिट दिले आहे.

याचबरोबर, नवी दिल्लीतून प्रवेश साहिब सिंग वर्मा, जंगपुरामधून सरदार तरविंदर सिंग, मालवीय नगरमधून सतीश उपाध्याय, आरके पुरममधून अनिल शर्मा, मेहरौलीमधून गजेंद्र यादव, छतरपूरमधून कर्तारसिंग तंवर, आंबेडकर नगरमधून खुशीराम चुनार, कालकाजीमधून रमेश बिधुरी, बदरपूरमधून नारायण दत्त शर्मा, पटपरगंजमधून रवींद्र सिंग नेगी, विश्वास नगरमधून ओम प्रकाश वर्मा, कृष्णा नगरमधून अनिल गोयल, गांधीनगरमधून अरविंदर सिंग लवली, सीमापुरीतून कुमारी रिंकू, रोहतास नगरमधून जितेंद्र महाजन आणि घोंडामधून अजय महावर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना संधीदुसऱ्या पक्षांतून बंडखोरी करून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांनाही पक्ष हायकमांडने विधानसभा निवडणुकीत संधी दिली आहे. यामध्ये करतार सिंग तंवर, राजकुमार चौहान, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत दोन महिलांना तिकीटभाजपने २९ जागांसाठी ज्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, त्यापैकी दोन महिला आहेत. रेखा गुप्ता यांना शालीमार बागमधून उमेदवारी देण्यात आली असून सीमापुरी अनुसूचित जाती मतदारसंघातून कुमारी रिंकू यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाdelhiदिल्लीAAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालAtishiआतिशीdelhi electionदिल्ली निवडणूक