शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:29 IST

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःचा पक्ष (काँग्रेस) वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर आपण देश वाचवण्यासाठी लढत आहोत. असे आम आदमी रक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल आहे. तत्पूर्वी, सीलमपूर भागात काँग्रेसच्या एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर, काही वेळातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली.

यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी, आपचे संयोजक देखील पंतप्रधानांप्रमाणेच प्रचार आणि खोटी आश्वासने देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या दोहोंनाही वाटते की, मागास, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यकांना भागिदारी मिळू नये. यामुळेच ते जातवार जनगणनेसंदर्भात गप्प आहेत. 

राहुल गांधींनी करून दिली शीला दीक्षित यांच्या शासन काळाची आठवण - अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी पुढे म्हणाले, "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. आम्ही घराबाहेर पडू शकत नाही, अत्यंत प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?" असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला. 

आप आणि काँग्रेसचे संबंध बिघडले -दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A. मधील आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली नव्हती. तेव्हापासूनच या दोन्ही पक्षांचे संबंध बिघडलेले आहेत. तत्पूर्वी, या दोन्ही पक्षांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक दिल्लीमध्ये एकत्रितपणे लढवली होती. तथापि, आता दोन्ही पक्ष ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहेत.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Arvind Kejriwalअरविंद केजरीवालRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAam Admi partyआम आदमी पार्टी