शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

'अरविंद केजरीवाल स्वतःवर गोळी झाडण्याची शक्यता...', मनोज तिवारींची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 16:44 IST

Delhi Politics: भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवालांबाबत मोठा दावा केला आहे.

Arvind Kejriwal News: दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येवून ठेपली आहे. त्यामुळे भाजप आणि आम आदमी पार्टीने प्रचार सुरू केला असून, नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच, भाजप खासदार मनोज तिवारी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 'अरविंद केजरीवाल स्वतःवरही गोळ्या झाडून घेऊ शकतात. ते जे बोलतात, ते करत नाही, म्हणून ते जे बोलतात, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. यावेळी दिल्लीवकर त्यांना नक्की निरोप देतील आणि भारतीय जनता पक्षालाच निवडतील,' असा विश्वास मनोज तिवारींनी व्यक्त केला.

मनोज तिवारी पुढे म्हणतात, 'अरविंद केजरीवाल विविध डावपेच अवलंबतात. काल त्यांनी स्वतःवर मिनरल वॉटर शिंपडून घेतले. मी तर म्हणेन की, त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. ते स्वतः त्यांच्या वाहनांवर गोळीबार करुन घेऊ शकतात. त्यांना लोकांचा गोंधळात टाकायचे आहे. त्यांच्याकडे आता कुठलेच मुद्दे उरले नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कट रचला जाऊ शकतो.'

आपचे नेते गुन्हेगारांचे मनोबल वाढवत आहेतनरेश बल्यानच्या अटकेबाबत मनोज तिवारी म्हणाले, नरेश बल्यान खंडणीचे काम करायचा. त्याला सुपारी देणे, लोकांना त्रास देणे, टोळीयुद्धे उभारणे अशा गुन्ह्यांमध्ये अटक झाली आहे.  ज्या पक्षाचा नेता गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर भ्रष्टाचाराचा खटला प्रलंबित आहे तो पक्ष आपल्या भ्रष्ट नेत्यांना नक्कीच संरक्षण देईल. पण दिल्लीकरांना समजले आहे की, आम आदमी पक्षाचे नेते गुन्हेगारांचे मनोबल वाढवत आहेत, अशी टीकाही तिवारी यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीBJPभाजपा