शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत भाजपाची घोडदौड थांबली, आपचं जोरदार पुनरागमन, लढत रंगतदार स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 10:21 IST

Delhi Election 2025 Results Live Update: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट सुरू झाली आहे. तर सुरुवातीला मोठ्या फरकाने पिछाडीवर दिसत असलेल्या आपने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.  

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे दोन तास पूर्ण झाले असून, सुरुवातीच्या कलांमध्ये जोरदार मुसंडी मारत ५० जागांवर आघाडी घेणाऱ्या भाजपाची आता काहीशी पिछेहाट सुरू झाली आहे. तर सुरुवातीला मोठ्या फरकाने पिछाडीवर दिसत असलेल्या आपने पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.  सध्याच्या कलांमध्ये भाजपा ३९ तर आप ३० आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये निर्विवाद यश मिळवणाऱ्या आम आदमी पक्षाला यावेळी भाजपाने जोरदार टक्कर दिली होती. तर काँग्रेसही आक्रमकपणे विरोधात उभी राहिल्याने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत मिळत होते. त्यातच मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून आम आदमी पक्षाच्या पराभवाचं भाकित करण्यात आलं होतं. 

दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपाने जोरदार आघाडी घेण्यास सुरुवात केली होती. एकवेळ भाजपाने दिल्लीतील ७०  जागांवरील कल समोर आले तेव्हा ५० जागांवर आघाडी घेतली होती. तर आम आदमी पक्षाची १९ जागांपर्यंत पिछेहाट झाली होती. मात्र मतमोजणीच्या दुसऱ्या तासात आम आदमी पक्षाचं पुनरागमन होताना दिसत असून, आता आपने बऱ्याच मतदारसंघातील पिछाडी भरून काढली आहे. सद्यस्थितीत भाजपा ३९ तर आप ३० जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्लीच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्यासह आम आदमी पक्षाचे अनेक नेते पिछाडीवर पडले होते. तर आपचं प्रभावक्षेत्र असलेल्या अनेक मतदारसंघात भाजपाला आघाडी मिळताना दिसत होती.  

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025AAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस