शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

काँग्रेसची आणखी एक मोठी घोषणा, दिल्लीकरांना मिळणार २५ लाखांचा आरोग्य विमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:35 IST

Delhi Election 2025 : 'प्यारी दीदी योजने'नंतर काँग्रेसने आता दुसऱ्या मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. 

Delhi Election 2025 : नवी दिल्ली : आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आपसह सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस दिल्लीतील जनतेसाठी मोठमोठी आश्वासने देत आहे. 'प्यारी दीदी योजने'नंतर काँग्रेसने आता दुसऱ्या मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. 

काँग्रेसची दुसरी योजना म्हणजे 'जीवन रक्षा योजना'. पक्ष सत्तेत आल्यास या योजनेअंतर्गत प्रत्येक दिल्लीकराला २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. काँग्रेसने बुधवारी (दि.८) आश्वासन दिले की, दिल्लीत पुन्हा सत्तेवर आल्यास २५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा देण्यासाठी 'जीवन रक्षा योजना' सुरू केली जाईल.

ही योजना गेम चेंजर ठरेल - अशोक गेहलोतदिल्लीत काँग्रेसने 'जीवन रक्षा योजना' जाहीर केली. त्यावेळी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत म्हणाले की, पक्षाची ही प्रस्तावित योजना गेम चेंजर ठरेल. तसेच, दिल्लीत काँग्रेसचे सरकार बनण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. मला विश्वास आहे की हे देशासाठी देखील महत्त्वाचे आहे. प्रस्तावित योजना दिल्लीतील रहिवाशांच्या आरोग्यसेवा गरजा पूर्ण करण्यासाठी पक्षाची बांधिलकी दर्शवते.

दोन दिवसांपूर्वी 'प्यारी दीदी योजने'ची घोषणाकाँग्रेसने गेल्या सोमवारी प्यारी दीदी योजनेची घोषणा केली. प्यारी दीदी योजनेअंतर्गत पक्षाने सत्तेत आल्यास दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात या योजनेची घोषणा केली. दिल्ली निवडणुकीसाठी काँग्रेसची ही पहिलीच मोठी निवडणूक घोषणा होती.

टॅग्स :congressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतdelhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्ली