नवी दिल्ली - दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांत प्रत्येक बुथवर भाजप उमेदवाराला ५० टक्के मते मिळावीत, असे लक्ष्य ठेवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुधवारी केले. आम आदमी पक्ष (आप) ही आपदा (संकट) आहे. त्या पक्षाबद्दल जनतेत मोठा असंतोष आहे, असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, आपने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने लोक नाराज आहेत. आपचे पितळ पूर्णपणे उघडे पडले आहे. काँग्रेसशी हातमिळवणी करून या पक्षाने लोकांची फसवणूक केली आहे.
देशात कर दहशतवादात मध्यमवर्गाची झाली शिकार‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मध्यमवर्गासाठी सात कलमी जाहीरनामा जारी केला. ते म्हणाले की, अनेक सरकारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे आणि ते कर दहशतवादाचे शिकार आहेत.
सात कलमी जाहीरनामाशैक्षणिक बजेट सध्याच्या २ टक्क्यांहून वाढवून १० टक्के करणे.खासगी शाळांच्या शुल्कावर मर्यादा घालणे. उच्च शिक्षणासाठी अनुदान आणि शिष्यवृत्ती.आरोग्य सेवा खर्च वाढवणार.आरोग्य विमा प्रीमियमवरील कर काढून टाकणार.आयकर सवलत मर्यादा ७ लाख रुपयांवरून १० लाख रुपये. जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) काढून टाकणे.