दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच आज सकाळी सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे भर पावसातही लोकांनी घराबाहेर पळ काढला होता. गाझियाबाद, नोएडा आणि दिल्ली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले.
दिल्लीमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. सकाळी ९.०३ वाजण्याच्या सुमारास जवळपास १० सेकंदांपर्यंत जमीन हलत होती. हरियाणाच्या रोहतकमध्ये भूकंपाचे केंद्र होते.
भूकंप रिश्टर स्केल वापरून मोजले जातात. त्याला रिश्टर मॅग्निट्यूड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप १ ते ९ या आधारावर मोजले जातात. भूकंप त्याच्या केंद्रापासून म्हणजेच केंद्रबिंदूपासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीच्या आतून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेची तीव्रता यावरून मोजली जाते. या तीव्रतेवरून भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता अंदाजे मोजली जाते.