Delhi earthquake Updates: दिल्ली-एनसीआरमध्ये सोमवारी (१७ फेब्रुवारी) पहाटे भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचे केंद्र दिल्लीतील धौलाकुआमध्ये असलेल्या एका छोट्या तलावाखाली होते. तेथील भूकंपानंतरची दृश्य समोर आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धौलाकुआ येथे एक छोटा तलाव आहे. या तलावाच्या ठिकाणीच भूकंपाचे केंद्र होते, असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले. दिल्लीच्या भूकंपाचे केंद्र असलेल्या या ठिकाणी धक्क्याने काही झाडे कोसळून पडली. काही मोठी झाडे उन्मळून पडली आहेत.
भूकंपाचं केंद्र असलेल्या ठिकाणचा व्हिडीओ पहा
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राचे डॉ. ओपी मिश्रा यांनी सांगितले की, २००७ मध्येही याच छोट्या तलावाजवळ ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते. घाबरण्याचे कारण नाही कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे.
तलाव आहे भूकंपांचं केंद्र
ओपी मिश्रा यांनी सांगितले की, इथे छोट्या स्वरुपात भूकंप होऊन धक्के जाणवत असतात. सोमवारी आलेला भूकंप ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. २००७ मध्ये इथे ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.
१९९० पासून या ठिकाणी भूकंप होत आहे. हा भूकंप हायड्रोजेनिक मटेरियलमुळे झाला आहे. म्हणजे पाण्यामुळे किंवा इतर फ्लूईडमुळे खडक तुटतो आणि भूकंप होतो, असे मिश्रा यांनी सांगितले.