शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

दिल्लीत महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड हल्ला करणा-या डॉक्टरला अटक

By admin | Updated: December 25, 2014 14:45 IST

राजधानी दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी एका महिला डॉक्टवर झालेल्या अ‍ॅसिड हल्लाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - राजधानी दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात मंगळवारी एका महिला डॉक्टवर झालेल्या अ‍ॅसिड हल्लाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. या कटात एकूण चार जण आरोपी असून त्यापैकी दोघांना या आधीच अटक करण्यात आली होती.  सहपोलिस आयुक्त तेजिंदर लुथरा यांनी आरोपींच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक डॉक्टर, अजय यादव हा या हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार आहे. तो पीडित महिलेला अनेक वर्षांपासून ओळखत असून त्या दोघांनी एकत्र वैद्यकीय शिक्षणही घेतले आहे. दुस-या आरोपीचे नाव वैभव असून महिलेवर अ‍ॅसिड फेकताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेले अन्य दोन आरोपी आपण अल्पवयीन असल्याचा दावा करत आहेत. यादव हा पीडित महिलेच्या प्रेमात होता, मात्र तिने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर तिच्यावर सूड उगवण्यासाठी त्याने वैभवसोबत हा कट आखून तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. त्या दोघांनी या अल्पवयीन आरोपींना २५ हजार रुपये देऊन तिच्यावर हल्ला घडवून आणला. त्या दोन्ही आरोपींनी प्रथम एका मोटरसायकल चोरली व पीडित महिलेवर हल्ला करून नंतर तिची बॅग खेचून हे सर्व चोरीचे प्रकरण असल्याचा बनाव रचला. 
पीडित महिला मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या स्कूटरवरून ईएसआय रुग्णालयात जात असताना हल्लेखोर मोटरसायकलवरून आले आणि त्यांनी तिच्यावर अ‍ॅसिड फेकले. त्यानंतर त्यांनी तिच्या हातातील बॅग हिसकावून तेथून पळ काढला.  
या हल्ल्यात पीडित महिलेच्या चेह-याची उजवी बाजू ५० टक्के भाजली असून, उजव्या डोळ्याचेही थोडे नुकसान झाले आहे. तिच्यावर एम्स रग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्लायनंतर ही महिला बराच वेळ मदतीसाठी याचना करत होती  मात्र कोणीच तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही, असे सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळले आहे. अखेर तिच्या शेजा-याने तिला मदत केली आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.