शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

७०० तरुणींसोबत मैत्री, प्रायव्हेट फोटो आणि..., परदेशी मॉडेल बनून फसवणारा तरुण अटकेत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:46 IST

Delhi Crime News: जवळपास ७०० हून अधिक तरुणींशी मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत तरुणाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

जवळपास ७०० हून अधिक तरुणींशी मैत्री करून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत तरुणाला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा तरुण ऑनलाइन मैत्री करुन तरुणी आणि महिलांना ब्लॅकमेल करायचा तसेच त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने एक व्हर्च्युअल मोबाइल नंबर मिळवला होता. त्याचा वापर करून त्याने बंबल, स्नॅपचॅट आणि इतर अॅपवर एक फेक प्रोफाइल तयार केली होती. तसेच तो स्वत:ची ओळख अमेरिकेत राहणारा फ्रीलान्स मॉडेल म्हणून करून देत असे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्लॅकमेलरच्या टार्गेटवर १८ ते ३० वयाच्या तरुणी आणि महिला होत्या. तरुणी आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी आरोपीने आपल्या प्रोफाइलवर ब्राझीलच्या एका मॉडेलचा फोटो लावला होता.

ज्या महिलांशी बोलणं व्हायचं त्यांना तो आपण एका प्रोजेक्टसाठी भारतात आलोय, असं सांगायचा.  त्यानंतर तो त्या महिला किंवा मुलींशी मैत्री करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. तसेच जवळीक निर्माण झाल्यावर त्यांच्याकडून त्यांचे प्रायव्हेट फोटो मागून घ्यायचा.  एखादी तरुणी किंवा महिला या तरुणाच्या जाळ्यात सापडली की, आरोपी ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे वसूल करण्यासा सुरुवात करायचा.

या प्रकरणी १३ डिसेंबर २०२४ रोजी पश्चिम जिल्ह्यातील सायबर पोलीस ठाण्यातील पोलिसांना एक तक्रार मिळाली होती. तक्रार करणारी तरुणी दिल्ली विद्यापीठातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. तिने तक्रारीत सांगितले होते की, मी ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीला भेटले होते. त्यानी आपण यूएसमधील फ्रीलान्स मॉडेल असल्याचे सांगितले होते. चॅटिंगच्या माध्यमातून ओळख वाढल्यावर मी त्याला माझे काही प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ पाठवले. मी त्याला भेटायला बोलावले होते. मात्र त्याने नकार दिला. मात्र एके दिवशी माझ्या मोबाईलवर माझेच काही आक्षेपार्ह व्हिडीओ आले. तसेच हे व्हिडीओ पाठवणारी व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून माझ्यासोबत चॅटिंग करणारा तरुणच असल्याचे समजल्यावर मला धक्का बसला, असे या तरुणीने सांगितले. त्यानंतर पैसे न दिल्यास हे व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी आरोपीने पीडित तरुणीला दिली. त्यामुळे घाबरून या तरुणीने शक्य होईल, तेवढे पैसे आरोपीला दिले. मात्र तो आणखी पैसे मागू लागला. अखेरीस या प्रकाराची कल्पना या तरुणीने कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत आरोपीला बेड्या ठोकल्या.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमdelhiदिल्ली