शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: दिल्लीत २४ तास चालणार लसीकरण; मुख्यमंत्री केजरीवालांचं मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 06:47 IST

दिल्लीत सरकारी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांपैकी एक तृतीयांश केंद्रे रोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली असतील. सध्या दिल्लीत ७३९ लसीकरण केंद्रे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालतात.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने राज्यात ६ एप्रिलपासून सरकारी रुग्णालयांत रात्रीही कोरोना लसीकरण करण्याचे ठरवले आहे. दिल्लीत सरकारी रुग्णालयांतील लसीकरण केंद्रांपैकी एक तृतीयांश केंद्रे रोज रात्री नऊ ते सकाळी नऊ वाजेपर्यंत खुली असतील. सध्या दिल्लीत ७३९ लसीकरण केंद्रे सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत चालतात. सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत जे लोक आरोग्य सेतूसारख्या पोर्टलच्या माध्यमातून आधीच स्लॉट बुक करतात त्यांना प्राधान्य दिले जाते. लसीकरण साइट या सहा तासांसाठी जवळपास १०० स्लॉट सुरक्षित ठेवतात. दुपारी तीननंतर सगळ्या साइट्स ऑन-द-स्पॉट रजिस्ट्रेशन आणि लसीकरणासाठी खुल्या केल्या जातात. दिल्लीत सोमवारपर्यंत १५,८३,०४७ जणांना लस दिली गेली. येथे रोज ६० ते ८० हजार लोकांना लस दिली जात आहे. दिल्लीत कोरोनाचे एकूण ६,७६,४१४ रुग्ण आहेत. त्यातील ६,५१,३५१ लोक बरे झाले असून, सक्रिय रुग्ण १३,९८२ आहेत. कोरोनाने दिल्लीत आतापर्यंत ११ हजार ८१ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले की, दिल्लीत आयसीयू बेडची संख्या वाढवली आणि लसीकरणाची वेळ वाढवल्यामुळे जास्त लोकांना लाभ मिळेल.अटी आणि शर्तींत सूट द्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कोरोनाचा वाढता फैलाव पाहून सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.  त्यात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या अटी आणि शर्तींत सूट आणि लसीकरणासाठी वयाची अट काढून टाकण्याची मागणी केली आहे.  केजरीवाल म्हणाले की, लसीकरण मोहीम आणखी वेगाने पुढे न्यावी लागेल. नवी लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियम सरळ केले जावेत, कारण आतापर्यंतच्या लसीकरणाने हे सिद्ध केले आहे की, ही लस सुरक्षित आहे.  लसीकरणाचे नियम सरळ करून सगळ्यांना लस देण्याची परवानगी दिली जावी. परवानगी मिळाल्यास दिल्ली सरकार सर्व दिल्लीवासीयांना तीन महिन्यांत लस देऊ शकेल, असेही केजरीवाल यांनी पत्रात म्हटले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी