शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोराला तिरंग्याचा मान; पोलिसांनी शहीद जवानासारखे केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:52 IST

शहीद जवानांना किंवा देशातील विशिष्ट मानाचे पदं भूषवलेल्या व्यक्तींना तिरंग्यात गुंडाळून त्यांना निरोप देण्याचा प्रोटोकॉल आहे.

नवी दिल्ली : शहीद जवानांना किंवा देशातील विशिष्ट मानाचे पदं भूषवलेल्या व्यक्तींना तिरंग्यात गुंडाळून त्यांना निरोप देण्याचा प्रोटोकॉल आहे. पण राजधानी दिल्लीत एका मोराला तिरंग्यात गुंडाळून अंतिम निरोप देण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या या कृत्यामुळं नवा वाद उपस्थित झाला आहे.मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले असल्याचे स्पष्टिकरण दिल्ली पोलिसांनी दिले आहे. मोराला सन्मानाने अंतिम निरोप देणं हा प्रोटोकॉल असून भविष्यात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली, तरी आपण हेच करु असेही दिल्लीतील टिळक मार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या गेटवर जखमी अवस्थेत आढळला होता. जखमी अवस्थेतील मोराला पोलिसांनी चांदनी चौकातील प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान मोराचा मृत्यू झाला. त्यानंतर मोराचा मृतदेह जौनपूरमधील रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करण्यात आलं. वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पोलिसांनी मोराला एका लाकडी पेटीत बंद केलं. पेटीभोवती तिरंगा गुंडाळून त्याचं दफन केलं. या सर्व प्रकारामुलं नवा वाद तयार झाला आहे.  

मोर हा शेड्यूल -I पक्षी असल्यामुळे पोलिसांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केलं असल्याचं वन्यजीव कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. कायद्यानुसार शेड्यूल -I वर्गातील पक्षी राज्याची संपत्ती असते. त्याचा मृतदेह आढळल्यास त्याच्या शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क फक्त राज्य वनविभागाकडे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस