शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या UPSC विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये देणार", विकास दिव्यकीर्तींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 13:43 IST

Delhi coaching centre deaths: विकास दिव्यकीर्ती यांनी राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवासांपूर्वी दिल्लीतील जुने राजेंद्र नगर येथील राऊ आयएएस स्टडी सर्कल कोचिंगच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर दृष्टी आयएएसचे मालक विकास दिव्यकीर्ती यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. 

विकास दिव्यकीर्ती यांनी राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, दुर्घटना झालेल्या राऊ आयएएस स्टडी सर्कल सेंटरमधील इतर विद्यार्थ्यांनाही मोफत क्लास देण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी, विकास दिव्यकीर्ती यांनी या घटनेबाबत उशिरा भाष्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांची माफी मागितली होती. दृष्टी आयएएसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत जुन्या राजेंद्र नगर येथे झालेल्या दोन अपघातात ४ होतकरू विद्यार्थ्यांचा अकाली मृत्यू झाला. नीलेश राय या एका विद्यार्थ्याचा पाण्यामुळं रस्त्यावर विजेचा धक्का लागून मृत्यू झाला, तर श्रेया यादव, तान्या सोनी आणि निविन डॅल्विन या तीन विद्यार्थ्यांचा कोचिंग इन्स्टिट्यूटच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्यामुळे मृत्यू झाला. चारही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर ही अत्यंत दुःखाची वेळ आहे. 

या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आम्हाला माहित आहे की, कितीही पैसा मुलं नाहीत, हे दुःख मिटवू शकत नाही, तरीही या दुःखाच्या वेळी आमची भागीदारी व्यक्त करण्याच्या प्रयत्नात दृष्टी आयएएसने चारही कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतरही या कुटुंबांना अन्य काही मदत करता आली तर आम्ही करू, असे विकास दिव्यकीर्ती यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त, विकास दिव्यकीर्ती म्हणाले की, आम्ही राऊ आयएएसच्या सर्व सध्याच्या विद्यार्थ्यांना कोचिंगसह मदत करण्यास तयार आहोत. आम्ही सामान्य अध्ययन, टेस्ट सिरीज आणि वैकल्पिक विषयांच्या तयारीसाठी त्यांना विनामूल्य शैक्षणिक मदत आणि क्लासेस देऊ. या सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ५ ऑगस्ट २०२४ पासून करोलबाग येथील आमच्या कार्यालयात असलेल्या हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकतात.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगAccidentअपघात