शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून २०० युनिट्स वीज मोफत; विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 15:27 IST

दर महिन्याला २०० युनिट्सपर्यंत वीज वापरणाऱ्यांना बिल नाही

नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. दिल्लीकरांना दर महिन्याला २०० युनिट्स वीज मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांचा विजेचा वापर २०० युनिट्सपेक्षा कमी आहे, त्यांना बिल भरावं लागणार नाही. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महिन्याकाठी २०० युनिट्सपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांना वीज बिल द्यावं लागणार नाही, अशी घोषणा केजरीवालांनी केली. मात्र २०० युनिट्सचा टप्पा ओलांडताच बिल द्यावं लागेल. त्यातही २०१ ते ४०० युनिट्स दरम्यान वीज वापरणाऱ्यांना ५० टक्के अनुदान देण्यात येईल, असं केजरीवालांनी सांगितलं. आधीची सरकारं वीज बिलात वाढ करायची. मात्र आम्ही ग्राहकांना दिलासा देत आहोत, असा दावा त्यांनी केला. केजरीवालांच्या घोषणेनंतर ग्राहकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला. विजेचा वापर २०० युनिट्सपेक्षा वाढल्यास बिल कसं आकारलं जाणार, असा प्रश्न ग्राहकांना पडला. एखाद्या कुटुंबानं महिन्याला ३०० युनिट्स विजेचा वापर केला. तर २०० युनिट्सनंतरच्या पुढील १०० युनिट्सवर निम्मं बिल आकारण्यात येणार की संपूर्ण ३०० युनिट्सवर निम्मं बिल घेतलं जाणार, असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण झाला. अशा परिस्थितीत सरकार २०१५ मधील नियमाचा आधार घेईल. या नियमानुसार २०० युनिट्सपेक्षा अधिक वापर केल्यास संपूर्ण बिलाची निम्मी रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल. याचा अर्थ ३०० युनिट्सचा वापर केल्यास १५० युनिट्सचं बिल द्यावं लागेल.  

टॅग्स :electricityवीजArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप