शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 19:01 IST

अल-फलाह विद्यापीठ हे फरीदाबादच्या धौज गावात आहे. खरे तर, लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा डॉ. उमर नबी हा याच विद्यापीठात कार्यरत होता. यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले आहे. याशिवाय त्याचे दोन सहकारी, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन शाहिद हे दोघेही याच विद्यापीठात कार्यरत होते.

 

दिल्लीतील कार ब्लास्टनंतर, हरियाणातील फरीदाबाद येथील अल-फलाह विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या स्फोट प्रकरणातील संशयित डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन सईद हे दोघेही या विद्यापीठात कार्यरत होते. यामुळेच तपास यंत्रणांची दृष्टी आता या विद्यापीठावर आहे. या संस्थेचे संस्थापक जावेद अहमद सिद्दीकी असून, त्यांना पूर्वी साडेसात कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तीन वर्षांची शिक्षाही सुनावली गेली आहे. अरबी भाषेत ‘अल-फलाह’चा अर्थ, यश किंवा समृद्धी असा होतो.

या स्फोट प्रकरणाशी संबंध जोडला गेल्यानंतर, या विद्यापीठावर अंमलबजावणी संचालनालयाचेही (ईडी) लक्ष आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रनांनी विद्यापीठाच्या निधीची चौकशी सुरू केली आहे. संस्थापक जावेद अहमद यांचे विस्तृत कॉर्पोरेट नेटवर्क असून त्यांच्या नऊ कंपन्या अल-फलाह चॅरिटेबल ट्रस्टशी संबंधित आहेत. या कंपन्या शिक्षण, वित्तीय सेवा, सॉफ्टवेअर आणि ऊर्जा क्षेत्रात कार्यरत आहेत. तथापि, विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार मोहम्मद रजी यांनी सिद्दीकी यांच्यावरील फसवणुकीचे आरोप फेटाळले आहेत.

अल-फलाह विद्यापीठ हे फरीदाबादच्या धौज गावात आहे. खरे तर, लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा डॉ. उमर नबी हा याच विद्यापीठात कार्यरत होता. यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले आहे. याशिवाय त्याचे दोन सहकारी, डॉ. मुजम्मिल शकील आणि डॉ. शाहीन शाहिद हे दोघेही याच विद्यापीठात कार्यरत होते. हे विद्यापीठ आता प्रशासकीय आणि गुन्हेगारी तपास, अशा दोन्ही स्तरांवर तपासाच्या फेऱ्यात आले आहे.

विद्यापीठाला एनएएसीची नोटीस - दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगांतर्गत (यूजीसी) येणाऱ्या एनएएसी या एका स्वायत्त संस्थेने अल-फलाहला आपल्या वेबसाईटवर, मान्यते संदर्भात चुकीची माहिती दिल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. १२ नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीशीमध्ये, 'विद्यापीठाने आपल्या घटक महाविद्यालयांना एनएएसीने ‘A ग्रेड’ दिला असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांची मान्यता पूर्वीच संपुष्टात आली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Al-Falah University Under Scanner; Founder's Fraud Case Surfaces

Web Summary : Following the Delhi blast, Al-Falah University is under investigation due to suspected links of its staff. The founder faces fraud charges. 'Al-Falah' means success. Financial irregularities are probed as the university faces scrutiny and a notice from NAAC for false claims regarding accreditation.
टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादीdelhiदिल्लीRed Fortलाल किल्ला