शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 07:01 IST

Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याची शंका आहे. 

नवी दिल्ली / श्रीनगर - लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या कार स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोटक भरलेली कार चालवणारा व्यक्ती कश्मीरच्या पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याची शंका आहे. 

यामध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर केल्याचा संशय आहे. तपासात यंत्रणांनी यातील दहशतवादाच्या ‘व्हाइट कॉलर’ मॉड्यूलवर लक्ष केंद्रित केले असून, समाजासाठी उच्चशिक्षित व सुसंस्कृत मानले जाणारे हे गट एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके कसे मिळवू शकले, या दिशेने तपास सुरू आहे.जम्मू–कश्मीर पोलिसांनी स्फोटस्थळी सापडलेल्या अवशेषांशी ताडण्यासाठी उमरच्या आईचा डीएनए नमुना घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये स्फोटाला 'बॉम्ब ब्लास्ट' म्हटले गेले आहे व यूएपीए आणि एक्स्प्लोसिव्ह अॅक्टअंतर्गत दहशतवादी कटाचे कलम लावण्यात आले आहेत.

हा स्फोट घडायच्या काही तास आधीच पोलिसांनी ८ जणांना अटक केली होती, त्यात ३ डॉक्टरांचा समावेश आहे आणि अमोनियम नायट्रेट, डिटोनेटर आणि रसायने यासह २,९०० किलो स्फोटक साहित्य जप्त केले होते. फरीदाबादमधील अल फला युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असलेल्या डॉ. मुज्जम्मिल गनई आणि डॉ. शहीन सईद यांना अटक केली आहे. शहीन ही  जेश-ए-मोहम्मदची महिला भरती प्रमुख असल्याचा आरोप आहे.  उमर नबी, हा देखील त्याच नेटवर्कशी जोडलेला होता. त्याने  आय२० कारमध्येच स्फोटक भरून दिल्लीमध्ये प्रवेश केल्याचे तपासात आढळले आहे.  

का केला असावा स्फोट?स्फोट घडवून आणणारी कार डॉ. उमर चालवत होता, असे तपासात  पुढे आले आहे. इतर साथीदार डॉक्टरांप्रमाणे तो पकडला जाईल, अशी त्याला भीती होती, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे मानले जाते. 

संशयितांचा देशभरात शोधया तपासाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआयएकडे दिली आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षेचा आढवा घेण्यासाठी मंगळवारी दिल्लीत बैठक घेतली. जैश-ए-मोहम्मद आणि गजवार-ए-हिंदसारख्या संघटनांनी नव्या रूपात सुरू केलेल्या या व्हाइट कॉलर दहशतवादाचा छडा लावण्यासाठी सुरक्षा व तपास यंत्रणांनी आता देशभर संशयितांचा शोध सुरू केला आहे. 

सीसीटीव्ही : स्फोटाआधी कार ३ तास पार्किंगमध्येकार सूनहरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये ३ तास उभी होती. त्या काळात उमर आपल्या साथीदारांच्या अटकेबाबत इंटरनेटवर माहिती शोधत होता. पार्किंगमधून कार निघाल्यानंतर ४ मिनिटांनी लाल किल्ल्याजवळ एका सिग्नलवर ती आली आणि स्फाेट झाला.  कारमध्ये डाॅ. उमर एकटाच होता, अशी प्राथमिक माहिती आहे. एका सीसीटीव्हीमध्ये त्याने कारचे पीयूसी केल्याचेही दिसते.

स्फोटासाठी काय वापरले?  प्राथमिक तपासानुसार, कारमध्ये अमोनियम नायट्रेट, फ्यूएल ऑइल, डिटोनेटर वापरले गेले असण्याची शक्यता आहे. नायट्रोजनयुक्त खतांसाठी, तसेच दगडांच्या खाणींत नियंत्रित स्फोटांसाठी वापरले जाणारे अमोनियम नायट्रेट एक घातक शस्त्र म्हणून दिल्लीच्या स्फोटात वापरण्यात आले.  

यापूर्वी मुंबई अन् दिल्लीतही रसायनांचा वापर मुंबई आणि दिल्लीत २००० ते २०११ या काळात झालेल्या स्फोटांमध्ये इंडियन मुजाहिद्दीन या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेने या रसायनाचा बॉम्ब तयार करण्यासाठी वापर केला होता.

...म्हणून खतांमधील वापरावर मर्यादाअमोनियम नायट्रेटचा या प्रकारे वापर होऊ नये, म्हणून २०११ मध्ये सरकारने खतांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात या रसायनाचा वापर करण्यास बंदी घातली होती. अमोनियम नायट्रेटच्या आयातीवरही सरकारने २०१५ मध्ये सरकारने बंधने टाकली.

हा स्फोट घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने केलेले एक दहशतवादी कृत्य असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, एनआयए या संस्थेला केवळ दहशतवादी प्रकरणांची चौकशी करण्याचा अधिकार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: 'White Collar' Terror Link, Pulwama Doctor Suspect

Web Summary : Delhi car blast investigated by NIA, linked to 'white collar' terror. Pulwama doctor suspected as driver. Ammonium nitrate used. Arrests made, nationwide search underway for suspects connected to Jaish-e-Mohammed.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटTerror Attackदहशतवादी हल्ला