शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
2
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
3
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
4
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
5
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
6
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
7
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
8
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
9
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
10
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
11
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
12
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
13
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
14
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
15
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
16
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
17
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
18
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
19
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
20
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?

काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:04 IST

Delhi Blast Update: जम्मू–कश्मीर पोलिसांनी तीन दिवसांत दहशतवादी नेटवर्कविरुद्ध महामोहीम राबवली असून, सुमारे १,५०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या स्थानिक समर्थन यंत्रणेला उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यभरात झडती मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

- सुरेश एस डुग्गरजम्मू - जम्मू–कश्मीर पोलिसांनी तीन दिवसांत दहशतवादी नेटवर्कविरुद्ध महामोहीम राबवली असून, सुमारे १,५०० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या स्थानिक समर्थन यंत्रणेला उद्ध्वस्त करण्यासाठी राज्यभरात झडती मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

कुलगाम, सोपोर व आसपासच्या भागांत जमात-ए-इस्लामी तसेच जेकेएनओपीएसशी संबंधित व्यक्तींच्या घरांवर आणि कार्यालयांवर पोलिसांनी छापे टाकले. या मोहिमेत ४०० पेक्षा जास्त ठिकाणी घेराबंदी आणि शोधमोहीम करण्यात आली. सुमारे ५०० संशयितांशी चौकशी झाली असून, काहींना प्रतिबंधात्मक कायद्यान्वये मट्टन (अनंतनाग) कारागृहात हलवले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान मोबाइल, लॅपटॉप, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले. काही जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांकडून दहशतवादी नेटवर्कला मिळणाऱ्या मदतीचा मागोवा घेण्यासाठी चौकशी सुरू आहे.

पोलिस पथकांचे छापेजेईआय ही संघटना आपल्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून आपल्या कारवाया पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.या दरम्यान काश्मीर खोऱ्यातील  कुलगाम, पुलवामा, शोपियान, बारामुल्ला व गंदरबल जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलिस पथकांनी छापे टाकले. यावेळी पोलिसांनी जेईआयचे सदस्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या घरांची व परिसराची झडती घेतली. 

३० ठिकाणी छापेसोपोरमध्ये पोलिसांनी बुधवारी जमात-ए-इस्लामीशी संबंधित २५ ते ३० ठिकाणी एकत्रित छापे टाकले. या कारवाईदरम्यान संशयास्पद दस्तऐवज, इलेक्ट्रॉनिक डेटा आणि छापील साहित्य जप्त करण्यात आले असून, अनेक जणांची चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kashmir Crackdown: 1500 Detained, Raids Intensify Across Multiple Locations

Web Summary : Authorities detained 1500 people in Kashmir amid intensified raids targeting terrorist networks. Over 400 locations were searched, leading to seizures and questioning. Suspects linked to Jamaat-e-Islami are being investigated for aiding terrorism.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटJammu Kashmirजम्मू-काश्मीर