शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:18 IST

Delhi Blast: 'आपला देश असुरक्षित;अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत. '

Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी(दि.11) संध्याकाळी झालेल्या भीषण स्फोटात 10 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर केंद्र सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. काँग्रेस, टीएमसीसह अनेक पक्षांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

7 महिन्यांत 41 भारतीयांचा मृत्यू; जबाबदार कोण?

काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका करत म्हटले की, गेल्या 7 महिन्यांत 41 भारतीयांचा दहशतवादी हल्ल्यांत मृत्यू झाला आहे. लाल किल्ल्याजवळचा स्फोट ही त्या साखळीतील आणखी एक शोकांतिका आहे. यासाठी जबाबदार कोण आहे? दिल्लीमध्ये 10 लोकांचे प्राण गेले आणि कालच फरीदाबादमध्ये 360 किलो स्फोटक पकडले गेले. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटक राजधानीच्या जवळ कसे आले? ही गंभीर सुरक्षा चूक नाही का?

अमित शाह हे अपयशी गृहमंत्री आहेत. दिल्ली पोलिस कोणाच्या अखत्यारीत येतात? देशाच्या सीमांची जबाबदारी कोणावर आहे? IB कोणाला रिपोर्ट करते? या सगळ्यांची जबाबदारी शेवटी गृहमंत्र्यांवरच येते. भारतीयांच्या आपल्याच देशात हत्या होत आहेत आणि मोदी-शाहांना केवळ निवडणुकीच्या भाषणांसाठी वेळ आहे. देश सुरक्षित नाही. सरकारही उत्तर देण्यापासून पळ काढत आहे, अशी टीका त्यांनी केली. 

18 तास झाले, पण गृहमंत्री मौन 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला. 18 तास झाले आहेत, पण गृहमंत्र्यांनी अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर अफवा आणि वेगवेगळ्या गोष्टी पसरत आहेत. जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा पंतप्रधानांनी सौदीचा दौरा रद्द करुन भारतात परतले होते. पण आता दिल्ली ब्लास्टनंतर ते भूटानच्या दौर्‍यावर गेले आहेत. देश संकटात असताना पंतप्रधान परदेशात का गेले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast: Congress targets Modi, Shah over Indian deaths.

Web Summary : Following the Delhi blast and recent terror attacks, Congress leaders criticize Modi and Shah, questioning their responsibility for national security failures and rising Indian fatalities.
टॅग्स :delhiदिल्लीRed Fortलाल किल्लाBombsस्फोटकेBlastस्फोट