शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

Delhi Asssembly Elections 2020: काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:26 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसनं पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं ओखलामधून परवेझ हाश्मीला मैदानात उतरवलं आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसनं पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं ओखलामधून परवेझ हाश्मीला मैदानात उतरवलं आहे. तसेच मादीपूरमधून जयप्रकाश पवार आणि विकासपुरीमधून मुकेश शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याशिवाय ब्रिजवासन आणि महरौलीमधूनही उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही जागांवरून काँग्रेसनं क्रमशः प्रवीण राणा आणि मोहिंदर चौधरी यांना तिकीट दिलं आहे.काँग्रेसनं आतापर्यंत 70 पैकी 66 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात 54 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 32 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 14 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीनंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांची मुलगी शिवानी चोपडांपासून, तर प्रचार समिती प्रमुख कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. जवळपास डझनभर असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी पक्षातील नेत्यांच्या मुला-मुलींना, पत्नी, सून इत्यादींना तिकिट देण्यात आले आहे.दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून, केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. भाजपाने राहिलेल्या 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रवींद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला सोडण्यात आली आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकcongressकाँग्रेसPoliticsराजकारणRahul Gandhiराहुल गांधी