शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभा निवडणूक : तरुणांसाठी काँग्रेसची मोठी घोषणा, दर महिन्याला मिळणार 8500 रुपये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 14:40 IST

राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली...

काँग्रेसने आज त्यांच्या तिसऱ्या गॅरंटीची घोषणा केली. ही घोषणा तरुणांसाठी असून तिचे नाव 'युवा उडान योजना', असे आहे. आपले सरकार आल्यास, आपण बेरोजगार तरुणांना एक वर्षासाठी दर महिन्याला प्रशिक्षणार्थी म्हणून ८५०० रुपये मदत म्हणून देऊ, अशी घोषणा काँग्रेसने केली आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी राजधानी दिल्लीत ही घोषणा केली.

तत्पूर्वी, दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीचे प्रमुख देवेंद्र यादव यांनी शनिवारीच सोशल मीडियाद्वारे, सचिन पायलट दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यालयात एक मोठी घोषणा करणार आहेत, अशी माहिती दिली होती. काँग्रेसने सर्वात पहिले महिलांसाठी सन्मान निधीची घोषणा केली होती. यात, सरकार स्थापन झाल्यानंतर, 'प्यारी दीदी योजने'अंतर्गत महिलांना दरमहा ₹ २५०० देण्याची घोषणा करण्यात आली होती. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली होती.

मोफत उपचारांची गॅरंटी -काँग्रेसच्या दुसऱ्या गॅरंटीमध्ये मोफत उपचारांचा समावेश होता. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिल्लीत ही घोषणा केली. या हमीला जीवन रक्षा योजना, असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत, सर्व नागरिकांना २५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच, आमची 'मनिषा' दिल्लीतील लोकांची 'सुरक्षा', असेही काँग्रेसने म्हटले होते. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025congressकाँग्रेसElectionनिवडणूक 2024delhi electionदिल्ली निवडणूक