दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. यात भाजपला मोठा विजय मिळाला आहे. यासंदर्भात, पक्षाने अत्यंत उत्तम कामगिरी केली, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या स्मृती इराणी यांची दिली आहे. त्या म्हणाल्या, "अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आपण भारतीय राजकारणात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात आलो आहोत. मात्र तसे करण्यात ते अपयशी ठरले आणि स्वतःच दारू घोटाळ्याचे आरोपी बनले. केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या विकास कामांनाही विरोध केला. मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानते की, त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि सुशासनावर विश्वास दाखवला."
जनतेने केजरीवाल यांना मुक्त केले... - माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, "भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर आज दिल्लीत एक इतिहास रचला आहे. मी दिल्लीतील जनतेचे आभार मानते की, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गॅरंटीवर विश्वास दाखवला आणि भाजपला सेवा करण्याची संधी दिली. सत्तेच्या अहंकारात बुडालेले अरविंद केजरीवाल आज पराभूत झाले आहेत. मलावाटते की, आपल्या दुष्कृत्यांबद्दल आरामात तुरुंगात जाण्यासाठी जनतेने त्यांना मुक्त केले आहे."