शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Delhi Election Result: 'आय लव्ह यू' म्हणत अरविंद केजरीवालांचा 'दिलवाल्या' दिल्लीकरांना 'फ्लाइंग किस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 16:50 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहेत.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. आपच्या देदीप्यमान विजयानंतर दिल्लीस्थित पार्टीच्या कार्यालयातून अरविंद केजरीवालांना भारत माता की जयचा जयघोष केला आहे. तसेच दिल्लीवाल्यानं भारीच काम केलं आहे. दिल्लीवालो I LOVE YOU, असंही केजरीवाल म्हणाले आहेत. केजरीवाल म्हणाले, फक्त दिल्लीच नव्हे, तर हा भारत मातेचा विजय आहे. हे नव्या पद्धतीचं राजकारण आहे. मी सर्वच दिल्लीवासीयांचा आभारी आहे. आम आदमी पार्टीवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी जनतेला धन्यवाद दिला आहे. अरविंद केजरीवाल कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, आज भगवान हनुमानाचा दिवस आहे. ज्यांनी दिल्लीच्या लोकांना आशीर्वाद दिलेला आहे. 'केजरीवाल देशद्रोही नसून कट्टर देशभक्त, दिल्लीकरांनी दाखवून दिलं'दिल्ली विधानसभेत आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता स्पष्ट झालंय. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंह यांनी हा विजय जनतेचा असल्याचं म्हटलं. तसेच, दिल्लीच्या लोकांनी दाखवून दिलंय की, त्यांचा मुलगा देशद्रोही नसून कट्टर देशभक्त आहे. दिल्लीकरांनी दाखवलेल्या या विश्वासाबद्दल त्यांचे आभार, असेही संजय सिंह यांनी म्हटले आहे. मोदींनी आपल्या भाषणाता नाव न घेता केजरीवाल यांना देशद्रोही असे म्हटले होते. त्यास, सिंह यांनी निकालानंतर उत्तर दिलंय. दरम्यान, मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहाविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे. मोदींचा सल्ला ऐकून दिल्लीतील जनतेनं मतदान प्रक्रियेतून भाजपाला देशद्रोही घोषित केल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूकAAPआप