शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली विधानसभा निवडणूक: उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप करणार अनेक सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 04:52 IST

विजयाचा भाजपला भरवसा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दमदार विजयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय मुद्दे आणि चांगल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी अनेक सर्व्हे करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.भाजप अनेक आघाड्यांवर काम करीत आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत राजधानी दिल्लीत मिळालेली ५५ टक्के मते पुन्हा मिळवीत पुढल्या वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणूक आरामात जिंकता येईल.अलीकडेच पार पडलेल्या दिल्ली भाजप नेत्यांच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपच्या पारड्यात पडलेली ५५ टक्के मते विधासभा निवडणुकीत मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, असे भाजपचे संघटन सचिव सिद्धार्थन यांनी सांगितले. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडमध्ये आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक मुदतीआधी होण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने बैठकांचे सत्र सुरू केले आहे.विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघनिहाय विशेष मुद्दे ठरविणे, भाजप आमदारांसोबत दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या सरकारच्या कामगिरीचे आकलन करणे आणि योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी नेत्यांच्या लोकप्रियतेचे विश्लेषण करण्यासाठी तीन टप्प्यांत सर्वेक्षण करण्याचा भाजपचा बेत आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.२०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने ७० पैकी ६७ जागा जिंकून भाजपचा पराभव केला होता. तथापि, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीपेक्षा भाजपला ६७ मतदारसंघांत जास्त मते मिळाली होती. त्यामुळे दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप विजयी होईल, अशी आशा भाजप नेते बाळगून आहेत. दोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. वेगवेगळ्या वस्त्यांत रात्री मुक्काम करून तेथील लोकांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी अनधिकृत झोपडपट्ट्यांना भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत, असेही त्या नेत्याने सांगितले.निश्चित विजय होण्याची आशादोन दशकांपासून भाजप दिल्लीतील सत्तेपासून दूर आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव ओसरला आहे, तेव्हा यावेळी भाजप निश्चित विजयी होईल अशी आशा आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

टॅग्स :delhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपाAAPआप