शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Delhi Election Result: दिल्लीत त्रिशंकू स्थिती झाल्यास काँग्रेसची आपसोबत आघाडी?; केजरीवालांविरोधात लढणारे संदीप दीक्षित म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 08:12 IST

बहुमतासाठी आप किंवा भाजपला काही जागा कमी पडल्यास काँग्रेसची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Delhi Assembly Election 2025 Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष तिसऱ्यांदा दिल्लीची सत्ता आपल्या हाती राखण्यात यशस्वी होतो की आपचा पराभव करून भाजप सत्ताधीश बनतो याची सर्वांना उत्सुकता आहे. 'आप'विरोधात भाजप व काँग्रेसने जोरदार प्रचार केला. त्यातील काँग्रेसची कामगिरी वाईट होण्याची तसेच भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता बहुतांश एक्झिट पोलनी व्यक्त केली आहे. मात्र बहुमतासाठी आप किंवा भाजपला काही जागा कमी पडल्यास काँग्रेसची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून 'आप'ला पाठिंबा दिला जाणार की नाही, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं असून नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी आम आदमी पक्षासोबतच्या संभाव्य युतीवर भाष्य केलं आहे.

संदीप दीक्षित हे अरविंद केजरीवाल यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक लढवत आम आदमी पक्षावर खरमरीत टीका केली होती.  मात्र आता निवडणूक निकालाला अवघे काही तास बाकी असताना दीक्षित यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आपसोबत युती करायची की नाही, याचा निर्णय हायकमांडकडून घेतला जाईल, अशी माहिती संदीप दीक्षित यांनी दिली आहे. 

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान पार पडले. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत ६०.४२ टक्के मतदान झाले आहे.  

दरम्यान, विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत बहुमतासाठी ३६ जागा जिंकणं आवश्यक आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत आपने ६२ तर भाजपने ८ जागा जिंकल्या होत्या. आपने २०१३ मध्ये पहिल्यांदा दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत आपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यावर अरविंद केजरीवालांनी ४९ दिवस सरकार चालवले होते. त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत मात्र केजरीवाल यांनी स्पष्ट बहुमत मिळवले. सलग तीन वेळा आपचे सरकार दिल्लीत राहिले आहे. यावेळी दिल्लीकर केजरीवालांना पुन्हा संधी देणार का की भाजपकडे सत्तेच्या चाव्या देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालcongressकाँग्रेसAAPआप