सध्या दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील मुस्तफाबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित केले आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांना माहीत आहे की ते निवडणुकीत पराभूत होत आहेत. अमित शहा म्हणाले, आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांची जागा पटपडगंजमधून बदलण्यात आली. याशिवाय इतर अनेक नेत्यांची तिकिटे रद्द करण्यात आली. यावेळी अमित शाह यांनी आपचा ३जी सरकार असा उल्लेख केला.
अमित शाह यांनी सांगितला '३जी'चा अर्थ३जीचा अर्थ सांगताना शाह म्हणाले, पहिल्या 'जी'चा अर्थ घोटाळ्यांनी भरलेले सरकार, दुसऱ्या 'जी'चा अर्थ घुसखोरांना आश्रय देणारे सरकार आणि तिसऱ्या 'जी'चा अर्थ भ्रष्टाचार (घपले) करणारे सरकार.
...पण आजपर्यंत ना छठपूजेच्या घाटांची सुधारणा झाली ना यमुनेचे पाणी स्वच्छ झाले -यमुना नदीच्या स्वच्छतेसंदर्भात बोलताना अमित शाह यांनी केजरीवालांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, केजरीवाल म्हणाले होते की, आपण यमुना नदी स्वच्छ करू, छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल आणि मी यमुनेत डुबकी मारेन. पण आजपर्यंत ना छठपूजेच्या घाटांची सुधारणा झाली ना यमुनेचे पाणी स्वच्छ झाले.
तुम्हीच प्रदूषण पसरवून यमुनेचे पाणी विषारी केले -"हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळले, असे म्हणत ते (केजरीवाल) केवळ बहाना करत आहेत. केजरीवालजी, हरियाणा सरकारने विष मिसळले नाही, तर तुम्हीच प्रदूषण पसरवून यमुनेचे पाणी विषारी केले आहे," असा आरोपही शाह यांनी यावेळी केला.