शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"ज्याची भीती होती तेच झालं...! हे आले तर..."; भाजपची घोषणा 'बदल के रहेंगे'वरून अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 21:55 IST

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या 'बदलकर रहेंगे' घोषणेवरून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे...

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकारणाचा पारा तापताना दिसत आहे. येथे आम आदमी पार्टी आणि भाजप एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपच्या 'बदलकर रहेंगे' घोषणेवरून पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. "भाजपने आपले इरादे स्पष्ट केले आहेत आणि जर यांना मतदान केले, तर हे 'आप'ने केलेली कामे बदलतील," असे केजरीवाल यांनी म्हटेल आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले, आज भाजपने 'बदल के रहेंगे', अशी घोषणा दिली आहे. ज्याची भीती होती तेच झाले. मी आधीच सांगितले होते की, यांना मत दिले तर आम आदमी पक्षाच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत दिल्लीतील जनतेच्या सोबतीने, जी कामे केली आहेत, ती सर्व कामे हे लोक बंद करतील.

'मोफत वीज बंद करतील' -माजी मुख्यमंत्री केजरीवाल पुढे म्हणाले, "आज त्यांनी अधिकृतपणे सर्व काही बदलणार असल्याची घोषणा केली आहे. अर्थात, 24 तास वीज बंद होईल, पुन्हा लोअडशेडिंग सुरू होईल, मोफत वीज बंद होईल, हजारो रुपये महिन्याचे वीज बिल यायला सुरुवात होईल, महिलांचा मोफत बस प्रवास बंद होईल, सर्व सरकारी शाळा पुन्हा बर्बाद होतील, सर्व मोहल्ला क्लिनिक बंद केले जातील, सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये मिळणारी मोफत औषधी आणि उपचार बंद होतील, अत्यंत काळजीपूर्वक मतदान करा. यांनी यांची भावना स्पष्ट केली आहे."

कायदा आणि सुव्यवस्थेवरूनही भाजपवर निशाणा - अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "आज सकाळी झोपेतून उठलो तेव्हा समजले की, दिल्लीतील विश्वास नगरमध्ये मॉर्निंग वॉक करून आपल्या घराकडे निघालेल्या एका भांडे व्यापाऱ्याची रस्त्यात आठ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन जण मोटारसायकलवरून आले आणि त्यांची हत्या करून फरार झाले. एक दिवस दिल्लीचे वातावरण असे होईल याची कधी कल्पनाही केली नव्हती."

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAam Admi partyआम आदमी पार्टी