शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या पहिल्या यादीला उशीर? राज्यातील मित्रपक्षांशी चर्चा प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:30 IST

भाजप नेतृत्वाचे असे मत आहे की, १०० नावांची पहिली यादी जाहीर केल्याने गोंधळात असलेल्या इंडिया आघाडीतील पक्षांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो.

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या १०० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यास विलंब होऊ शकतो. आपले उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्ष नेतृत्व राज्यांतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठका घेत आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावे असू शकतात, असा दावाही करण्यात येत आहे. 

भाजप नेतृत्वाचे असे मत आहे की, १०० नावांची पहिली यादी जाहीर केल्याने गोंधळात असलेल्या इंडिया आघाडीतील पक्षांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि इतर राज्यांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ‘बुडत्या जहाजाला’ बाजूला करत आहेत. पहिली यादी महत्त्वाची ठरेल, कारण सत्ताधारी पक्षाने लोकसभेच्या ५४३ पैकी ३७० जागा जिंकण्याचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. 

महाराष्ट्रात मित्रपक्षांना आणखी प्रतीक्षा nमहाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार गट यांच्यासह मित्रपक्ष जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची वाट पाहत आहेत. बारामतीसह जिंकू न शकलेल्या १६० जागांचेही भाजपने लक्ष्य ठेवले आहे. nया जागा एनडीएकडे आणण्यासाठी वजनदार नेत्यांना या ठिकाणी रिंगणात उतरवायचे आहे. उत्तर प्रदेशातही राजभर, अनुप्रिया पटेल, संजय निषाद आणि इतर नेत्यांसोबतची चर्चा राजकीय कारणांमुळे प्रलंबित आहे. 

बिहारमध्ये अडचणीभाजपचे काही अंतर्गत प्रश्नही आहेत. बिहारमध्ये जदयूला २०१९ प्रमाणे १७ जागा द्यायच्या का याबाबतही विचार सुरू आहे. पासवान यांच्या पक्षाच्या दोन गटांसोबत जागावाटपाचा मुद्दाही भाजपला हाताळावा लागत आहे. पशुपती पारस यांच्या नेतृत्वाखालील गटाशी चर्चा होत आहे. उपेंद्र कुशवाह, जीतनराम मांझी यांना जागा द्यायची की नाही हेही ठरवायचे आहे.   

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभा