शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय विद्यापीठात आता पदवी प्रवेश सीईटीद्वारेच; देशातील सर्व ४५ शिक्षण संस्थांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 06:27 IST

बारावी परीक्षेतील गुणांना नसेल महत्त्व

नवी दिल्ली : देशातील सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांच्या पदवी वर्गांतील प्रवेशासाठी पहिल्यांदा केंद्रिकृत परीक्षा (सीईटी) होईल. त्यासाठी बारावी परीक्षेत मिळालेल्या गुणांचे काही महत्त्व नसेल आणि प्रवेश फक्त सीईटीच्या गुणांवर मिळेल. एप्रिल महिन्यात सीईटीची अधिसूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सी जारी करील आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा १३ भारतीय भाषांमध्ये होईल. जर कोणी विदेशी विद्यार्थी केंद्रीय विद्यापीठांत विदेशी भाषा किंवा साहित्य शिकू इच्छित असेल तर त्यासाठी १९ विदेशी भाषांचा पर्यायही असेल. याशिवाय पदवी अभ्यासक्रमासाठी २७ विषयांच्या निवडीचा पर्याय असेल. त्यातून विद्यार्थी कमीतकमी एक आणि जास्तीत जास्त सहा विषयांची निवड करू शकेल. राज्य सरकारांची विद्यापीठे आणि अभिमत विद्यापीठांतील प्रवेशासाठीही सीईटीची अनिवार्यता नसेल. परंतु, जर त्यांना हवे असेल तर सीईटीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देऊ शकतील. दिल्लीस्थित जामिया मिलिया इस्लामिया आणि सेंट स्टिफेंस महाविद्यालयाशिवाय अलीगढ मुस्लिम विद्यापीठसारख्या अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्येही प्रवेश सीईटीद्वारेच दिला जाईल. पीजीसाठीही सीईटीयावर्षी एनटीए पदव्युत्तर वर्गांतील प्रवेशासाठीही सीईटी आयोजित करील. परंतु, केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या गुणांच्या आधारे प्रवेश घेण्याची सक्ती नसेल.ते पदवी परीक्षेतील गुणांच्या आधारावर किंवा स्वत: आपली प्रवेश परीक्षा आयोजित करून प्रवेश देऊ शकतील. परंतु, शक्यता अशी की येत्या काही वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही सीईटीद्वारेच प्रवेश मिळेल.गेल्या वर्षीही सीईटीचे आयोजन केले गेले होते. परंतु, तेव्हा केंद्रीय विद्यापीठांत त्या आधारावरच प्रवेश देण्याची सक्ती नव्हती.तेव्हा फक्त १२ विद्यापीठेच या योजनेत सहभागी झाले होते. यावेळी सर्व ४५ केंद्रीय विद्यापीठांसाठी सीईटी अनिवार्य केली गेली आहे.