शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

"एक दिवस POKचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात राहायचं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 14:31 IST

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.

नवी दिल्लीः चीन आणि नेपाळ यांच्यात वाढत्या सीमा विवादांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर मोठा हल्लाबोल केला आहे. एक दिवस असा येईल, जेव्हा पीओकेचे लोकच म्हणतील आम्हाला भारतात जायचं आहे, असं विधान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी केलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मू जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, कलम ३७० हटवल्यापासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. येत्या पाच वर्षांत आपण जम्मू-काश्मीरचे चित्र इतके बदलू की पीओकेचे लोकही म्हणतील, आम्हाला आता भारतासोबत राहायचे आहे. जेव्हा पीओकेचे लोक आम्हाला पाकिस्तानबरोबर नव्हे, तर भारतात राहायचं आहे, असं म्हणतील त्याच दिवशी आमच्या संसदेचा ठराव पूर्ण झाला, असे आम्ही समजू. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या संरक्षण धोरणात झालेल्या बदलांसंदर्भातही सांगितलं आहे. ते म्हणाले की, हवामान बदलले असून, त्याचा परिणाम आता इस्लामाबादमध्येही पाहायला मिळतोय. पाकिस्तानमध्ये त्याचे पडसाद स्पष्टपणे दिसून येत आहेत. पाकिस्तानची सैन्य सतत गैरवर्तन करीत असते, परंतु भारतीय सैन्य सतत पाकिस्तानच्या कृतींवर लक्ष ठेवून आहे आणि त्यास वेळोवेळी योग्य प्रत्युत्तर देत आहे. संरक्षणमंत्र्यांनीही अजित पंडिता यांना वाहिली श्रद्धांजली जम्मू जनसंवाद रॅलीत दहशतवाद्यांच्या हातून ठार झालेल्या सरपंच अजित पंडिता यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही श्रद्धांजली वाहिली. 1947मध्ये काश्मीर खो-यात तिरंगा फडकवणा-या मोहम्मद मकबूल शेरवानीचींदेखील त्यांना आठवण आली. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा वापरल्या जात असत आणि पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे वापरले जात होते, पण तिथे फक्त तिरंगा डौलानं फडकताना दिसेल, असंही  राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा

बापरे! कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच महिलेवर अंत्यसंस्कार; 'एवढे' पॉझिटिव्ह तर तब्बल 350 कुटुंबांवर टांगती तलवार

कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!

'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित

CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPOK - pak occupied kashmirपीओके