शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण भारताच्या शक्तिशाली फायटर विमानातून अनुभवणार उड्डाणाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 19:22 IST

भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत.

ठळक मुद्देनिर्मला सीतारमण यांच्याआधी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 2009 साली सुखोई 30 मार्क वनमधून उड्डाणाचा अनुभव घेतला होता. तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या झालेल्या करारानुसार रशियन बनावटीची ही विमाने आता भारतात बनवण्यात येतात. 

नवी दिल्ली - भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण येत्या 17 जानेवारीला सुखोई 30 मार्क वन या लढाऊ विमानातून उड्डाण करणार आहेत. इंडियन एअर फोर्सच्या जोधपूर बेसवरुन त्या सुखोईमधून उड्डाणाचा अनुभव घेणार आहेत. सुखोई 30 मार्क वन हे भारतीय हवाई दलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान आहे. या उड्डाणातून त्या सुखोई विमानाची क्षमता आणि तयारीचा आढावा घेणार आहेत.      

निर्मला सीतारमण यांच्याआधी भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी 2009 साली सुखोई 30 मार्क वनमधून उड्डाणाचा अनुभव घेतला होता. सुखोईमधून उड्डाण करणा-या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रप्रमुख आहेत. वयाच्या 74 व्या वर्षी फायटर जेटमधून उड्डाण करुन त्यांनी विश्वविक्रम रचला होता. जवळपास 30 मिनिट त्यांनी सुखोईमधून सफर केली होती. पुण्याच्या लोहगाव विमानतळावरुन त्यांच्या सुखोईने भरारी घेतली होती. सुखोई हे भारताचे चौथ्या पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या झालेल्या करारानुसार रशियन बनावटीची ही विमाने आता भारतात बनवण्यात येतात. 

 

सुखोईमधून सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीमागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताने सुपरसॉनिक ब्राह्मोस क्षेपणास्त्राची सुखोई फायटर जेट विमानातून घेतलेली चाचणी यशस्वी ठरली होती.  आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. सुखोई-30एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील अत्याधुनिक लढाऊ विमान आहे. ब्राह्मोसची सुखोईवरुन घेण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरल्यामुळे भारतीय हवाई दलाची शत्रू प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे.  

ब्राह्मोस हे वर्ल्डक्लास क्षेपणास्त्र आहे. भारताकडे आता जमीन, समुद्र आणि हवेतून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे. सुखोईमधून ब्राह्मोस डागल्यानंतर या क्षेपणास्त्राने बंगालच्या सागरातील आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतला. ब्राह्मोस आणि सुखोई हे कॉम्बिनेशन सर्वात खतरनाक असून शत्रू सैन्यासाठी धोक्याची घंटा आहे.               

जगातील हे एक वेगवान क्रूझ मिसाईल आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी डीआरडीओच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले होते. रशियाचे एनपीओएम आणि भारताचे डीआरडीओ या दोघांनी मिळून  संयुक्तपणे ब्राह्मोसची निर्मिती केली आहे. चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता आणखी 42 सुखोई विमानेही ब्राह्मोसने सुसज्ज करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन