शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 08:51 IST

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे.

ठळक मुद्देसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. धोकादायक युद्धभूमी मानल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील सियाचिनमध्ये सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भेटण्यासाठी राजनाथ सिंह हे या भागाला भेट देणार आहेत.

नवी दिल्ली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सियाचिन दौऱ्यावर आहेत. संरक्षणमंत्रिपद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. धोकादायक युद्धभूमी मानल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमधील सियाचिनमध्ये सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना भेटण्यासाठी राजनाथ सिंह हे सोमवारी (3 जून) या भागाला भेट देणार आहेत. लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत त्यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत. 

राजनाथ सिंह हे लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांच्यासह लेहमधील लष्कराच्या 14 कॉर्प्सचे मुख्यालय, तसेच श्रीनगरमधील 15 कॉर्प्सचे मुख्यालय यांनाही भेट देणार आहेत. लष्कराचे उच्चपदस्थ अधिकारी संरक्षणमंत्र्यांना पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील एकूण सुरक्षाविषयक परिस्थितीची, तसेच काश्मीरमधील दहशतवादविरोधी मोहिमांबद्दल या दौऱ्यात माहिती देणार आहेत. 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीहून जम्मू काश्मीरला भेट देण्यासाठी जात असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. सियाचिनमधील लष्कराचे फील्ड कमांडर आणि सैनिक यांच्याशी संरक्षणमंत्री संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. शपथविधी आधी राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय शौर्य स्मारकाला भेट दिली होती. शहीद जवानांना आदरांजली वाहिली होती. त्यावेळी त्यांनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांशी संवाद साधला होता. तसेच सैन्यापुढील आव्हाने आणि कामांविषयी अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (3 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये  शोपियान जिल्ह्यातील  मोलू चित्रगम परिसरात सोमवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादीलपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा