शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
4
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
5
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
6
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
7
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
8
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
9
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
10
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
11
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
12
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
13
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
14
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
15
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
16
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
17
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
18
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
19
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
20
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 

पीक, वंश वाचवण्यासाठी भाजपला पराभूत करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 10:34 IST

“शेतकरी समजदार असल्यामुळे कोणाला मत द्यावे हे त्याला  चांगले समजते.” टिकैत यांनी थेट कोणाचेही नाव न घेता आमची संघटना राजकीय नाही, असे त्यांनी म्हटले. 

मुरादाबाद (उत्तर प्रदेश) : पीक आणि वंश वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करा, असे आवाहन संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांनी येथे शेतकऱ्यांना केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठीचे मतदान गुरुवारी होत असताना टिकैत यांनी हे आवाहन पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, “भाजपने शेतकऱ्यांचे शोषण केले म्हणून या निवडणुकीत त्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे.” संयुक्त किसान मोर्चाने ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी शेतकरी नेते योगेंद्र यादव उपस्थित होते. मोर्चाच्या नेत्यांनी स्पष्टपणे म्हटले की, भाजपने शेतकऱ्यांचे शोषण केले म्हणून या निवडणकीत त्याला दंड जरूर मिळायला हवा. केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार सतत खोटे  बोलत आहेत आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहेत. सरकारला जी भाषा समजते त्याच भाषेत आम्ही त्याला सांगू.“शेतकरी समजदार असल्यामुळे कोणाला मत द्यावे हे त्याला  चांगले समजते.” टिकैत यांनी थेट कोणाचेही नाव न घेता आमची संघटना राजकीय नाही, असे त्यांनी म्हटले.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतBJPभाजपा