शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाचा अवमान करणं, कायदा मोडणं लोकांच्या रक्तात- सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:51 IST

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस खेहर यांनी न्यायालयाचा अवमान करणारे आणि कायदा मोडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देकायदा तोडणं आणि न्यायालयाचा अवमान करणं हे हळूहळू आपल्या संस्कृती आणि रक्तात मिसळत चाललं आहे. न्यायालयाचा अवमान करणं हे सहन केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एक विकसित देश बनवायचा आहे, तर कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे.तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, असंही जे. एस. खेहर म्हणाले आहेत

नवी दिल्ली, दि. 31 - सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. एस खेहर यांनी न्यायालयाचा अवमान करणारे आणि कायदा मोडणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. कायदा तोडणं आणि न्यायालयाचा अवमान करणं हे हळूहळू आपल्या संस्कृती आणि रक्तात मिसळत चाललं आहे. 

मेल टुडेच्या वृत्तानुसार, जस्टिस खेहर यांनी ही टिप्पणी सुनावणीदरम्यान केली होती. न्यायालयाचा अवमान करणं हे सहन केलं जाऊ शकत नाही. तुम्हाला एक विकसित देश बनवायचा आहे, तर कायद्याचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही कायद्याचं पालन केलं नाही, तर तुम्हाला शिक्षाही होऊ शकते, असंही जे. एस. खेहर म्हणाले आहेत. दिल्लीच्या लाजपत नगरमधल्या एका इन्स्टिट्यूचे हेड दिनेश खोसला यांनी घराच्या इमारतीचा उपयोग कमर्शियल वापरासाठी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीला विजय माल्यानं केलेल्या न्यायालयाच्या अवमानतेशीही जोडून पाहिलं जात आहे. माल्यानं न्यायालयाच्या आदेशानंतर हजर राहणं पसंद केलं नाही. माल्यानं बँकांचं 9000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवलं आहे. माल्या सध्या लंडनमध्ये सुरक्षितरीत्या राहतोय. 

मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांचा कार्यकाळ 24 ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. त्यांनी देशाचे पुढे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांच्या उत्तराधिका-याच्या स्वरूपात न्यायाधीस दीपक मिश्र यांचं नाव प्रस्तावित केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मूलभूत अधिकारांवरूनही सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला सुनावलं होतं. खासगीपणा अधिकार (राइट टू प्रायव्हसी) हा राज्यघटनेंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून विचारात घेतला जाऊ शकतो, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मान्य करताना त्याच्याशी संबंधित अनेक पैलू मात्र मूलभूत अधिकारात ठेवता येणार नाहीत, अशी भूमिका घेतली.सर्वोच्च न्यायालयाने १९५० आणि १९६२ मध्ये खासगीपणा हा मूलभूत अधिकार नाही, असा निवाडा दिला होता. खासगीपणा हा मूलभूत अधिकार असू शकेल, परंतु तो अमर्याद वा निरंकुश असू शकत नाही, असे अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी नऊ सदस्यीय खंडपीठापुढे म्हटले होते.