शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 08:47 IST

छपाकची तिकीटं रद्द करत असल्याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानं भाजपा नेत्यांकडून अभिनेत्री दीपिका पादुकोणवर टीका सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दीपिकानं जेएनयूच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दर्शवला. यानंतर दीपिका तुकडे-तुकडे गँगची सदस्य असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात आली. दीपिकाच्या आगामी छपाक चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन सोशल मीडियावरुन करण्यात आलं. त्यासाठी #boycottchhapaak वापरण्यात आला.दीपिकानं जेएनयूच्या कॅम्पमध्ये जाऊन आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेणं सोशल मीडियावर काहींना रुचलेलं नाही. त्यामुळेच दीपिकाच्या छपाक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन ट्विटरवरुन करण्यात येत आहे. अनेकांनी तर छपाकची तिकीटं आपण रद्द केल्याचं म्हणत तसे स्क्रिनशॉट्सदेखील ट्विटरवर शेअर केले आहेत. अधिकाधिक लोकांनी छपाकवर बहिष्कार घालावा या उद्देशानं हे स्क्रिनशॉट्स शेअर केले जात आहेत. पण ही सगळी तिकिटं अगदी सारखीच असल्याचं लक्षात येत आहे.  १० जानेवारीला म्हणजे उद्या छपाक चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटावर अधिकाधिक जणांनी बहिष्कार टाकावा यासाठी ट्विटरवरुन आवाहन करणाऱ्या अनेकांनी आपण चित्रपटाची तिकीटं रद्द केल्याचं म्हटलं आहे. छपाक चित्रपटाची तिकीटं रद्द करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण गंमत म्हणजे या सगळ्यांनी सारखीच तिकीटं रद्द केली आहेत. वडोदऱ्यातील अकोटामध्ये असणाऱ्या सिनेमार्क चित्रपटगृहात १० जानेवारीला संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी दाखवल्या जाणाऱ्या छपाकची तिकीटं रद्द करण्यात आल्याचं अनेकांच्या ट्विटमधून दिसतं. या सगळ्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या स्क्रिनशॉट्सवर नीट नजर टाकल्यास त्यावर गोल्ड क्लासमधील A8, A9 आणि A10 या सीट्सचा उल्लेख दिसेल. तिकीटं रद्द केल्यामुळे या सगळ्या मंडळींना ४२० रुपये परत मिळाले आहेत. त्यामुळे छपाकवर बहिष्कार टाकणारी सगळी मंडळी एकाच चित्रपटगृहात जाऊन फक्त तीन खुर्च्यांवर जाऊन बसणार होती की काय, असा गमतीशीर प्रश्न विचारला जात आहे. 

टॅग्स :Chhapaak Movieछपाकjnu attackजेएनयूDeepika Padukoneदीपिका पादुकोण